फैजपूरात बोकड्यांची मोठी मागणी करोडो रुपयांची बाजारात व्यवहारातून उलाढाल फैजपूर येथे बकरा ईद निमित्त बाजारात व्यापाऱ्यांची तुफान गर्दी इदू...
फैजपूरात बोकड्यांची मोठी मागणी करोडो रुपयांची बाजारात व्यवहारातून उलाढाल
फैजपूर येथे बकरा ईद निमित्त बाजारात
व्यापाऱ्यांची तुफान गर्दी
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथे दि.७ जून रोजी पवित्र बकरा ईद साजरी होणार असून फैजपूर येथे बुधवार रोजी आठवड्याचा बोकड्यांचा मोठा बाजार भरतो बकरा ईद निमित्त मालेगाव नाशिक मलकापूर बुलढाणा जळगाव भुसावळ आदी येथून बोकडा खरेदीसाठी विक्री व व्यापारी खरेदीसाठी येतात फैजपूर शहर हे बकरी मार्केट जिल्ह्यात प्राख्यात आहे आज दिनांक २८ मे रोजी बाजारात २००००/-, ३००००/-, ५००००/- ते एक लाखापर्यंत बोकड्यांची किंमत पाहण्यास मिळाली
येथे मोठ्या प्रमाणात या व्यवहारातून बाजारात उलाढाल झाली आहे आज दिनांक २८ मे रोजी सकाळपासून कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात हजारोच्या संख्येने विक्री व खरेदी व्यापारांनी मोठी गर्दी केली होती त्यामुळे वाहनांची रेलचेल पाहण्यास मिळाली फैजपूर वाहतूक पोलिसांनी दिवसभर वाहनांच्या ताफ्यामुळे कसरत करावी लागली फैजपुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे साहेब त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त बजावला होता.
No comments