डॉ.एल झेड पाटील साहित्य सेवा समर्पण पुरस्काराने सन्मानित इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) न्हावी येथील रहिवासी व आम्ही न्ह...
डॉ.एल झेड पाटील साहित्य सेवा समर्पण पुरस्काराने सन्मानित
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
न्हावी येथील रहिवासी व आम्ही न्हावीकर पुस्तकाचे लेखक डॉ.एल झेड पाटील यांना शुभंम साहित्य मंडळ,अकोला व तरुणाई फाऊंडेशन,कुटासा यांच्या सयुंक्त विद्यमाने ,"साहित्य सेवा समर्पण पुरस्कार."आणि नेहरु युवा केंद्र व नेहरु युवा मंडळ,कुटासा यांच्या स्युंक्त विद्यमाने "सामजिक प्रेरणा पुरस्कार" अनिल नामदेव ड़ाहेलकर,अध्यक्ष, संत गाड़गेबाबा कर्मभूमि सेवा प्रतिष्ठान ,मुर्तीजापूर यांच्या हस्ते पुणे येथे नुकताच प्रदान करण्यात आला. डॉ.एल झेड पाटील यांनी साहित्यामध्ये अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे.त्यांची पुस्तके चरित्रात्मक असून युवकांना प्रेरणा देणारी आहेत. अशा ज्येष्ठ लेखकाला पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

No comments