पुनगाव येथे गुरांच्या गोठ्यावर कोसळले बाभळीचे झाड एक म्हैस ठार विदगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) दि.६ मे रोजी आलेल्या वादळी वा...
पुनगाव येथे गुरांच्या गोठ्यावर कोसळले बाभळीचे झाड एक म्हैस ठार
विदगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दि.६ मे रोजी आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतीच नुकसान झाले असून या वादळी वाऱ्यामुळे पुनगाव येथील एका शेडवर बाभळीचे झाड पडल्याने गोठ्यातील 4 म्हशी दाबल्या गेल्या होत्या तर 3 म्हशींना काढण्यात यश आले असून 1 म्हैस ठार झाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की काल दिनांक सहा मे रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला होता यामुळे पुनगाव येथील शेतकरी युवराज बाविस्कर यांच्या शेतातील बाभळीचे झाड म्हशींच्या शेड वर कोसळल्याने शेडमध्ये असलेल्या 4 म्हशी दाबल्या गेल्या होत्या त्या पैकी पडलेल्या शेडातून 3 म्हशींना काढण्यात यश आले तर एक म्हैस मरण पावली सदरील घटनास्थळी आज सकाळी अडावद व धानोरा येथील पशुवैद्यकीय अधिकारीं भेट देवून मेलेल्या म्हशीचे पोस्टमार्टम केले तर पुनगाव येथील तलाठी यांनी पंचनामा केला .

No comments