adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत

 ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत देशभरातून सहभागी होणार सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि महासचिव   देशातील बिघडत चाललेल्या पत...

 ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत

देशभरातून सहभागी होणार सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि महासचिव  

देशातील बिघडत चाललेल्या पत्रकारितेवर होणार दोन दिवस चिंतन  

किरण चव्हाण अमळनेर

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

नवी दिल्ली : ५२ देशांतील ४ लाख ७० हजारांहून अधिक पत्रकारांशी संलग्न असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’, व्ही. ओ. एम. इंटरनॅशनल फोरम या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनांचे राष्ट्रीय अधिवेशन २०२५, २० व २१ मे रोजी नवी दिल्लीत पार पडणार आहे. हे अधिवेशन नवीन महाराष्ट्र सदन, कस्तुरबा गांधी मार्ग, नवी दिल्ली येथे होणार आहे. २० मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७ आणि २१ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिवाय १८ आणि १९ मे रोजी राष्ट्रीय कार्यकारणीची चिंतन बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात राष्ट्रीय कोर टीमचा ही सहभाग असणार आहे. 

२० व २१ मे रोजी होणाऱ्या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान संस्थापक अध्यक्ष मा. संदीप काळे भूषवणार आहेत. यावेळी मा. मनसुख मांडविया (केंद्रीय मंत्री - कामगार व रोजगार, तसेच युवा कार्य व क्रीडा), मा. किंजरापू राम मोहन नायडू (केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री), मा. जितनराम मांझी (केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री), मा. राज भूषण चौधरी (राज्य मंत्री - जलशक्ती मंत्रालय), माजी केंद्रीय गृहमंत्री मा. शिवराज पाटील चाकूरकर, पुडुचेरी विधानसभेचे अध्यक्ष मा. एम्बालम सेल्वम आणि देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

पत्रकार प्रशिक्षण सत्रासाठी कोच, सायकोलॉजिस्ट व काउन्सिलर ऊर्जा पाटील या मुख्य प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमात मा. भाऊसाहेब वाघचौरे (खासदार) यांना संसद भूषण पुरस्कार, मा. समीर कुणावार (आमदार) यांना विकास पुरुष पुरस्कार, मा. अनघा सराफ यांना उद्योग रत्न पुरस्कार, मा. वेंकटेश जोशी यांना समाज रत्न पुरस्कार आणि मा. डॉ. पंजाब खानसोळे यांना विकास रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे आयोजन गगन महोत्रा (राष्ट्रीय प्रमुख), दिव्या भोसले (राष्ट्रीय सरचिटणीस), अशोक वानखेडे (राष्ट्रीय संयोजक), चेतन बंडेवार (राष्ट्रीय कोषाध्यक्ष), भीमेश मूतुला (आरोग्य विभाग प्रमुख – भारत), मुफ्ती मोहम्मद हारून नदवी (उर्दू विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष), अमोल देशमुख (रेडिओ विंगचे अध्यक्ष), ए. राजशेखर (दक्षिण भारत अध्यक्ष), यांच्या पुढाकाराने होत आहे.

या अधिवेशनात व्हॉईस ऑफ मीडिया भारतभरातील राज्य अध्यक्ष आणि राज्य सरचिटणीस मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, संपूर्ण देशातून प्रतिनिधींची उपस्थिती लाभणार आहे.

देशभरातील पत्रकारांना एकत्र आणत पत्रकारिता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नव्या युगाच्या दिशेने हे राष्ट्रीय अधिवेशन प्रेरणादायी ठरणार आहे.

‘व्हॉईस ऑफ मीडिया’, व्ही. ओ. एम. इंटरनॅशनल फोरमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक १८ आणि १९ ला आहे. त्याचीही तयारी सुरू आहे. 

या  ‘राज्याचे अध्यक्ष’ सादर करणार त्यांच्या राज्यात होणाऱ्या कामाचा अजेंडा.

राज्यध्यक्ष (भारत):

अनिल म्हस्के (महाराष्ट्र),

वी. विमल बालाजी (आंध्र प्रदेश),

स्वप्ना दत्ता (आसाम),

राजेश कुमार दुबे (बिहार),

रमेश सिन्हा (छत्तीसगड),

भूषण अरोसकर (गोवा),

हितेश मारू (गुजरात),

बंसीलाल पांचाल (हरियाणा),

विकास शर्मा (हिमाचल प्रदेश),

गणेश रवि (झारखंड),

रवीकुमार मुढालियार (कर्नाटक),

दीपक शर्मा (मध्य प्रदेश),

ज्योतिंद्रो सिंग (मणिपूर),

किर्मेनलांग उरायाह (मेघालय),

मॅक्स खियेया (नागालँड),

प्रवतकुमार मिश्रा (ओडिशा),

अंकुश जैन (पंजाब),

गोपाल गुप्ता (राजस्थान),

नंदलाल शर्मा (सिक्कीम),

बालाजी ए. (तामिळनाडू),

संगीता (तेलंगणा),

कौशिक अधिकारी (त्रिपुरा),

प्रेम पाठक (उत्तर प्रदेश),

सागर मलिक (उत्तराखंड),

सुमन गांगुली (पश्चिम बंगाल),

अक्षित महाजन (जम्मू आणि काश्मीर),

एम. कार्तिकेयन (पुडुचेरी),

हरमिंदर सिंह (चंदीगड)

नंदलाल शर्मा (सिक्कीम)

…....................

या राज्याचे ‘महासचिव’ सादर करणार त्यांच्या राज्यात झालेल्या कामाचा अजेंडा.

राज्य महासचिव (भारत):

दिगंबर महाले (महाराष्ट्र),

संजयकुमार चौहान (आसाम),

राजीव कुमार (बिहार),

वरिया हसमुखभाई (गुजरात),

रामकुमार झुड (हरियाणा),

भूषण शर्मा (हिमाचल प्रदेश),

राजीवकुमार त्रिपाठी (मध्य प्रदेश),

बबिना देवी (मणिपूर),

बाबुल डाखर (मेघालय),

थेजांगुनुओ चादी (नागालँड),

सुकांत कुमार परीदा (ओडिशा),

गुरदेव सिंग (पंजाब),

डॉ. अनिल शर्मा (राजस्थान),

बिक्रम कर्मकार (त्रिपुरा),

सुभाषचंद्र तिवारी (उत्तर प्रदेश),

रनिता घोषाल (पश्चिम बंगाल),

अमरीक सिंग (जम्मू आणि काश्मीर)

गणेशप्रसाद गोगटे (गोवा)

कोट 

“गेल्या तीन वर्षांपासून आमचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीतच होत आहे. या अधिवेशनात पत्रकार व पत्रकारितेच्या भविष्यासंदर्भात महत्त्वाच्या चर्चा होतात. याच मंचावरून पत्रकारिता आणि पत्रकारांविषयीचा राष्ट्रीय दृष्टिकोन ठरतो. पत्रकारांवर वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची ताकद अधोरेखित होते. ही एक शक्ती या अधिवेशनातून तयार होते.”

— संदीप काळे, संस्थापक अध्यक्ष, व्हॉईस ऑफ मीडिया – व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम

No comments