खड्ड्यात झाडे लावत केले अमळनेर काँग्रेसने गांधीगिरी आंदोलन किरण चव्हाण अमळनेर (संपादक -:-हेमकांत गायकवाड) अमळनेर पासूनचा राज्यमार्ग क्रमा...
खड्ड्यात झाडे लावत केले अमळनेर काँग्रेसने गांधीगिरी आंदोलन
किरण चव्हाण अमळनेर
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
अमळनेर पासूनचा राज्यमार्ग क्रमांक सहा हा बऱ्यापैकी रहदारीचा रस्ता आहे. कारण या रस्त्यावरून अमळनेर बस आकारातून बेटावद, नरडाणा, शिंदखेडा, दोंडाईचा अशा बऱ्याचशा लांब पल्ल्याच्या बसेस शहादापर्यंत जातात. तर गलवाडे, झाडी, भरवस, लोन पंचम, एक लहरे, शहापूर या गावातील, अनेक गावकऱ्यांचा, दुचाकी चार चाकी वर जाण्या येण्याचा हा रोजचा मार्ग आहे. परंतु या मार्गावर मुंदडा नगर2 च्या पुढे, श्री केले सरांच्या घराजवळ,वळणावर तीन महिन्यापासून एक मोठा खड्डा पडलेला आहे. आणि पाच-सहा दिवसाच्या वाळवा च्या तथा अवकाळी पावसामुळे खड्डा मोठा होत आहे. तेथे सर्व लहान मोठ्या वाहनांना चालविताना, चालकाला तारेवरची कसरत करावी लागते, कारण त्याच खड्ड्याजवळ रस्त्या च्या पश्चिमेला व पूर्वेला 90 डिग्री हा रस्ता वळतो. आणि खड्ड्यात पाणी साचल्याने, खड्ड्याचा खोलीच्या चालकांना अंदाज येत नाही. व त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आम्ही काँग्रेस प्रेमींनी जागेवर वाहन चालकांना उभे करून, त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. फारच कडवट, तिखट शब्दात वाहन चालकांनी खड्ड्याबाबत त्यांच्या व्यथा मांडल्या. अशा सर्व प्रकारच्या जनतेच्या त्रासाचा, नुकसानीच्या गांभीर्याने अंदाज घेऊन, खड्डे त्वरित दुरुस्त व्हायला पाहिजे म्हणून, अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीने गांधीगिरी करून, सदर रस्त्याच्या खड्ड्यात आज दिनांक 18 मे रोजी, रविवारी, सकाळी 10.00 वाजता वृक्षारोपण केले. तसेच मा. कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अमळनेर यांना वास्तविकेचे निवेदन देखील देणार आहोत, की जेणेकरून अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागाने, रस्त्याच्या कामाकडे तातडीने लक्ष दिले पाहिजे. सदरचा रस्ता हा दहा वर्षे ठेकेदाराने देखभाल करण्याच्या करारावर दिलेला आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभा गाने, ठेकेदाराकडून त्वरित सदर रस्त्याच्या खड्ड्याच्या दुरुस्तीचे काम करून घ्यावे. कारण पुढे सात जून पासून पावसाळा असल्याने खड्ड्याचा विस्तार वाढायला वेळ लागणार नाही. सदर गांधीगिरी कार्यक्रमास तालुका काँग्रेस अध्यक्ष भागवत सूर्यवंशी, शहराध्यक्ष मनोज पाटील, संदीप घोरपडे, शरद पितांबर पाटील, गजेंद्र साळुंखे भागवत गुरुजी, के.व्ही. पाटील, प्रताप नागराज पाटील, दिलीप साहेबराव पाटील, पी. वाय. पाटील, तुषार संधान शिव, भगवान संधान शिव, विठ्ठल पवार, प्रमोद पाटील, राजू भाट, बापूराव पाटील, मोहम्मद तेली, मनोहर पाटील, विलास सिताराम पाटील.आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments