Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आठ किलो गांज्यासह दोन आरोपी जेरबंद चोपड़ा ग्रामीण पोलिस स्टेशनची धड़क कारवाई

  आठ किलो गांजा सह दोन आरोपी जेरबंद चोपड़ा ग्रामीण पोलिस स्टेशनची धड़क कारवाई   चोपड़ा  प्रतिनिधी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) गलंगी ता. चोपडा...

 आठ किलो गांजा सह दोन आरोपी जेरबंद चोपड़ा ग्रामीण पोलिस स्टेशनची धड़क कारवाई  


चोपड़ा  प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

गलंगी ता. चोपडा येथील गलंगी पोलीस चौकी समोरील रोडवर आठ किलो गांज्यासह दोन आरोपी जेरबंद चोपड़ा ग्रामीण पोलिस स्टेशनची धड़क कारवाईने गांज्या विक्री वाल्या मध्ये घबराहट निर्माण झाली आहे.

    पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहिती प्रमाणे, दि.२९/०५/२०२५ रोजी दुपारी ३.३० वा. सुमारास गलंगी ता. चोपडा गावी गलंगी पोलीस चौकी समोर रोडवर चोपड़ा ग्रामीण पोलिस स्टेशनला मिळालेल्या माहिती नुसार पोलिसांनी सापळा रचुन शिव दिनेश भोसले वय-२२ वर्षे रा. पाळधी ता. धरणगाव जि. जळगाव, सुनिल यशवंत नन्नवरे वय-२० रा. पाळधी ता धरणगाव जि जळगाव हे दोघे १,७२,८१०/-रुकि.चा फुल बियांचा पाकळी असलेला हिरवट रंगाचा ओलसर गांजा एक पिवळ्या रंगाचे प्लॅस्टीक गोणीमध्ये मिळून आला. त्याचे वजन ०७ किलो ८५५ ग्रॅम मिळून आले. ७५,०००/- कि.एक हिरो कंपनीची स्पेलंडर काळ्या रंगाची तिचा क्र.एम. एच.१९ -ई.एच. -०८५४ आरोपीं यांचे ताब्यात मिळुन आली.  १०००/- एक संमसंग कंपनीचा निळ्या रंगाचा असा एकूण २,४८,८१०/- एकुण किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोहेको राकेश तानकु पाटील यांच्या फिर्यादी वरुन गुन्हा रजि.नंबर १७०/२०२५ गुंगीकारक औषधी द्रव्य आणी मनोवयावर  परिणाम करणारे पदार्थ अधि.१९८५-२० (ब),२२ गुन्हा नोंद करण्यात आले आहे पुढील तपास पो.नि कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहे

No comments