खडक पोलीस ठाण्याला पुरीगोसावी सातारकरांची सदिंच्छा भेट ..!! प्रतिनिधी. (पुणे जिल्हा ) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज रोजी खडक पोलीस ठ...
खडक पोलीस ठाण्याला पुरीगोसावी सातारकरांची सदिंच्छा भेट ..!!
प्रतिनिधी. (पुणे जिल्हा )
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज रोजी खडक पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी शशिकांत चव्हाण साहेब यांची जयहिंद साहेब असे म्हणत संभाजी पुरीगोसावी यांनी सदिंच्छा भेट घेतली... वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण साहेब हे मूळचे सातारा जिल्ह्यातील कोरेगांव तालुक्यातील आहेत. कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी यापूर्वी लष्कर काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्यांनी तेथील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक प्रभावी उपाययोजना केल्या होत्या. पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण हे पुणे शहर आणि परिसरांतील एक प्रसिद्ध पोलीस निरीक्षक म्हणून त्यांना ओळखले जाते. सध्या पुणे शहर आयुक्तालया अंतर्गत असणाऱ्या खडक पोलिस ठाणेचे प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. तसेच शिस्तप्रिय अधिकारी म्हणून देखील पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्याकडे पाहिले जाते.
No comments