आमच्या गल्लीतील खोदलेला रस्ता कधी पूर्ण करणार हो.... लोणवडी येथील नागरिक संतप्त 2 दिवसात काम चालू करतो म्हणून मागील महिन्यापासून भूलथापा ...
आमच्या गल्लीतील खोदलेला रस्ता कधी पूर्ण करणार हो.... लोणवडी येथील नागरिक संतप्त
2 दिवसात काम चालू करतो म्हणून मागील महिन्यापासून भूलथापा
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर:- तालुक्यातील ग्राम लोनवडी हे शहर लगतचे गाव सर्व सुख सुविधा जवळचं मात्र नेहमी गावातील विकासापासून वंचित? याबाबत अधिक माहिती अशी की गावातील ग्रामपंचायतीच्या कारभारामुळे मागील गेल्या दीड महिन्यापूर्वी 15 वा वित्त आयोगातील वार्ड नंबर 1 मध्ये ग्रामपंचायतने रस्ता लेव्हलसाठी खोदकाम, सफाई करून कामाला सुरूवात केली मात्र अद्यापही रस्ता पूर्ण करण्यात आला नसून तसाच सोडला आहे
मागील महिन्यात गावातील नागरिक, समाजसेवक यांनी रस्ता कधी पूर्ण होणार अशी विचारणा केली असता सरपंच पती यांनी 2 दिवसात काम सुरू होईल असे सांगितले होते मात्र कधी आमचा काम करणारा माणूस बाहेर गेला, तर कधी बांधकाम सामान येत आहे असे सांगून आतापर्यंत केवळ भूलथापा देत आहेत.15 वा वित्त आयोगाचे मंजुरीत झालेले काम मागील वर्षी पासून सुरू असून अद्यापही पूर्ण झालेलं नाही याकडे संबंधित जाणूनबुजून साखर झोपेत आहेत की ठेकेदारी मध्ये भागीदार, सहभागामुळे गप्प आहेत म्हणून काम बंद आहे का? याविषयामुळे संतप्त नागरिकांनी रोष व्यक्त केला पुढील आठवड्यात रस्ता पूर्ण न झाल्यास वार्डातील नागरिक, ग्रामस्थांनी वरिष्ठ अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन तक्रार देणार आहेत अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
No comments