अंतुर्लीत ग्रामपंचायत मार्फत फॉगिंग मशिनद्वारे धूरधुरळणी करण्याची मागणी किरण धायले मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) सध्या वातावरणा...
अंतुर्लीत ग्रामपंचायत मार्फत फॉगिंग मशिनद्वारे धूरधुरळणी करण्याची मागणी
किरण धायले मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सध्या वातावरणात बदल झाल्यामुळे व पावसाळ्याचे दिवस असल्याने ग्रामपंचायतीमार्फत पावसाळ्यापूर्वी गटारी आणि सार्वजनिक ठिकाणी असलेला कचरा त्वरित साफ करण्यात यावा ठिकठिकाणी या कचऱ्यामुळे व गटारीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे त्यामुळे उपाययोजना म्हणून त्वरित गटारी साफ करणे, ठीक ठिकाणी लाईटची व्यवस्था करणे, रस्त्यांची डागडुजी करणे, रस्ते दुरुस्ती करणे, नळांच्या पाईपलाईन दुरुस्त करणे ही कामे त्वरित करण्यात यावी. यामुळे रोगराईस आळा बसेल साथीचे रोग पसरणार नाही तसेच त्वरित फॉगिंगमशीन व्दारे धूर धुरळणी करण्यात यावी अशी मागणी नागरिका कडून करण्यात येत आहे.
गावातील रस्त्याने वाहने चालवताना अपघात होत असतात त्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने त्वरित लक्ष घालून अतिक्रमण हटवावे, अतिक्रमण होणार नाही यासाठी उपाययोजना करावी व रस्ते रहादरिसाठी मोकळे करून द्यावे.अशी मागणी करण्यात आली आहे.
No comments