adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल शहरामध्ये १९ मे रोजी श्री स्वामी समर्थांच्या पालखीचे आगमन

  यावल शहरामध्ये १९ मे रोजी श्री स्वामी समर्थांच्या पालखीचे आगमन  भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)          श्री स्वा...

 यावल शहरामध्ये १९ मे रोजी श्री स्वामी समर्थांच्या पालखीचे आगमन 



भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

         श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट या न्यासाच्या वतीने अनंत कोटी ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पालखी-पादुकांचे दर्शन व सेवा समंध महाराष्ट्रातील गावो गावी असलेल्या स्वामी भक्ताना दर्शन करतायावे या साठी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी-पादुका परिक्रमेचे आयोजन केलेले आहे तसेच अन्यकारणास्थव दुरवरच्या अबाल वृद्ध,महिला व स्वामी भक्ताना श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या दर्शनासाठी इच्छा असुनही स्वामींच्या मूळस्थानी अक्कलकोट येथे येता येत नाही अशांना दर्शन देण्यासाठी व त्यांची सेवा घेण्यासाठी श्री स्वामीच त्यांच्या गावी येत आहे 

      श्री स्वामी समर्थ महाराज पालखी सोहळा दिनांक १९।५।२०२५ सोमवार रोजी यावल

शहरामध्ये आगमन होत आहे 

    संध्याकाळी ५.३० वाजता धनश्री टॉकीज बोरवाल गेट यावल येथुन मान्यवरांच्या हस्ते विधीवत पूजा होऊन यावल शहराच्या मुख्य रस्त्यावरून सहवाद्य मिरवणूक ही बोरावल गेट,गवत बाजार,अपना बाजार,महाजन टी डेपो,चावडी मार्ग कोर्ट रोड,रेणुकादेवी मंदिर शिवाजी नगर येथे श्री प्रा मुकेश येवले यांच्या निवासस्थानी संध्या ७ वाजता महापूजा,आरती व महाप्रसाद होऊन श्रींच्या पालखीचे मुक्काम असणार आहे या श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन प्रा मुकेश येवले व त्यांचा परिवार सलग १५ वर्षापासून करण्यात येत आहे 

दिनांक २०।५।२०२५ मंगळवार रोजी सकाळी ७ वाजता श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुकांचे अभिषेक होणार आहे व त्यानंतर श्रींच्या पालखीचे प्रस्थान फैजपूर येथे होणार असून श्री स्वामी समर्थ महाराज्यांच्या पालखीच्या दर्शनाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे

No comments