मनसेच्या शहर उपाध्यक्षपदी श्रीकृष्ण मेंगडे,ललित (बंटी) शर्मा यांची नियुक्ती. जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगाव- महाराष्ट...
मनसेच्या शहर उपाध्यक्षपदी श्रीकृष्ण मेंगडे,ललित (बंटी) शर्मा यांची नियुक्ती.
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते ॲड जयप्रकाश बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शहर बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये जळगाव महानगरपालिका च्या निवडणुकीच्या अनुषंगाने जळगाव मध्ये नवीन दोन शहर उपाध्यक्ष अनुक्रमे श्रीकृष्ण मेंगडे,ललित शर्मा, यांची नियुक्ती करण्यात आली. श्रीकृष्ण मेंगडे व ललित (बंटी) शर्मा यांची मनसे नेते माजी आमदार ॲड जयप्रकाश बाविस्कर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
नियुक्ती देतेवेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड जमील देशपांडे,जनहित जिल्हा संघटक राजेंद्र निकम, शहराध्यक्ष किरण तळले, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, चेतन पवार, संदीप मांडोळे, प्रकाश जोशी, ॲड सागर शिंपी, राहुल चव्हाण, खुशाल ठाकूर, महेंद्र सपकाळे, सतीश सैंदाणे, हर्षल वाणी, सर्व महाराष्ट्र सैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान जळगाव शहर महानगरपालिका निवडणूक लढण्यासंदर्भात सुद्धा सविस्तर चर्चा करण्यात आली व पक्ष बांधणी व संघटन यावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना मनसेचे नेते ॲड जयप्रकाश बाविस्कर यांनी दिल्या. श्रीकृष्ण मेंगडे व ललित शर्मा यांना सर्व सहकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.

No comments