adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वादळी वारे व अवकाळी पाऊस यामुळे धानोरा व अडावद मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान

  वादळी वारे व अवकाळी पाऊस यामुळे धानोरा व अडावद मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान आमदार चंद्रकांत सोनवणे,निवासी उपजिल्हाधिकारी गजानन पाटोळ...

 वादळी वारे व अवकाळी पाऊस यामुळे धानोरा व अडावद मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान

आमदार चंद्रकांत सोनवणे,निवासी उपजिल्हाधिकारी गजानन पाटोळे,उपविभागीय अधिकारी अमळनेर नितीन कुमार मुंडावरे यांनी नुकसान झालेल्या गावांची केली पाहणी 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

देवगाव,पुनगाव,धानोरा,लोणी पंचक,खर्डी,बिडगाव या गावांमध्ये प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली असता केळी व पपई या पिकांची नुकसान झालेले आहे.यावेळी वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या,पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने कंपनीशी टोल फ्री क्रमांक वर किंवा ई सेवा केंद्र येथून ऑनलाईन तक्रारी कराव्यात असे देखील सूचित केले, बाधीत शेतकरी यामधून वगळला जाणार नाही याबाबत दक्षता घेण्याबाबत निर्देश देण्यात आले,


तालुक्यातील इतर गावांमध्ये देखील शेती पिकांची व घरांचे नुकसान झालेले असून त्याची पाहणी संबंधित तलाठी,कृषी सहाय्यक व ग्रामसेवक करत‌ आहेत.भविष्यात शासनाकडून वितरित होणाऱ्या अनुदानासाठी ऍग्री स्टॅक नोंदणी बंधनकारक असल्याचे शेतकरी यांना सुचित करण्यात आले.

आमदार चंद्रकांत सोनवणे,निवासी उपजिल्हाधिकारी गजानन पाटोळे,उपविभागीय अधिकारी अमळनेर नितीन कुमार मुंडावरे यांनी नुकसान झालेल्या गावांची केली पाहणी.काल दिनांक सहा मे रोजी सायंकाळी वादळी वारे व अवकाळी पाऊस यामुळे धानोरा व अडावद मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याची आज सकाळी नऊ वाजेपासून पाहणी करण्यात आली.

नुकसान झालेल्या सर्व शेतकरी ग्रामस्थ यांचे पंचनामे केले जातील याबाबत तहसीलदार,गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांनी नियोजन केलेले आहे.दौऱ्या दरम्यान तहसीलदार भाऊसाहेब थोरात,प्रभारी तालुका कृषी अधिकारी रामचंद्र पाटील,प्रभारी गट विकास अधिकारी अनिल विसावे,संबंधित गावांची तलाठी,मंडळ अधिकारी,कृषी सहाय्यक उपस्थित होते.

No comments