वसंतराव नाईक विकास महामंडळ प्रादेशिक व्यवस्थापक दत्तू सांगळे सेवानिवृत्त,मुंबईत मोठ्या उत्साहात सेवानिवृत्तीचा कार्यक्रम पडला पार सचिन ...
वसंतराव नाईक विकास महामंडळ प्रादेशिक व्यवस्थापक दत्तू सांगळे सेवानिवृत्त,मुंबईत मोठ्या उत्साहात सेवानिवृत्तीचा कार्यक्रम पडला पार
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (३१):- अहिल्यानगर येथील रहिवासी वसंतराव नाईक विकास महामंडळ प्रादेशिक व्यवस्थापक तथा सामाजिक कार्यकर्ते श्री.दत्तू सांगळे हे प्रदीर्घ सेवेनंतर आज दि.31 मे 2025 रोजी या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत.त्यांनी पदावर असताना अनेक गोरगरिबांची सेवा करून त्यांची कामे मार्गी लावून दिली त्यांना प्रत्यक्ष मदत केली.त्यांचा सेवानिवृतीचा कार्यक्रम मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडला.या प्रसंगी इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय मुंबई उपसचिव श्री.पेटकर,वसंतराव नाईक महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री.पवार तसेच वसंतराव नाईक महामंडळाच्या महाव्यवस्थापक सौ.स्मिता हिंदळेकर आदी सह महामंडळाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments