Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकाची दारूबंदी विरोधात दमदार कारवाई..!!

  उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकाची दारूबंदी विरोधात दमदार कारवाई..!! संभाजी पुरीगोसावी ( वर्धा जिल्हा) प्रतिनिधी. (संपादक -:-...

 उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकाची दारूबंदी विरोधात दमदार कारवाई..!!


संभाजी पुरीगोसावी ( वर्धा जिल्हा) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

दि 30/05/025 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकातील पोलीस हवालदार अश्विन सुखदेवे ,पोलीस नाईक रविन्द्र घाटुर्ले, पोलीस शिपाई राकेश इतवारे, भारत बुटलेकर यांना एक इसम हा बजाज 220 पल्सर कंपनी च्या मोटरसायकलवर गावठी मोहा दारूची वाहतूक करीत आहे अश्या मुखबीर कडुन मिळालेल्या खाञीशीर खबरे वरून माता मंदिर वॉर्ड रोडवर पंच व पो.स्टॉप सह नाकेबंदी करून वाहतूक करणाऱ्या इसमास रंगेहाथ पकडून जागीच सविस्तर मौक्का जप्ती पंचनामा कारवाई करून बजाज २२० पल्सर व गावठी मोहा दारू असा जु की 1,22,000 /- रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने , पो स्टे, हिंगणघाट येथे परत येवुन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ......           

          सदरची कार्यवाही कामगिरी जिल्हा पोलीस अधिक्षक अनुराग जैन अपर पोलीस अधीक्षक सागर कवडे  उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित  यांच्या मार्गदर्शनाखाली  उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडील पोलीस हवालदार अश्विन सुखदेवे, पोलीस नाईक रविन्द्र घाटुर्ले, पोलीस शिपाई , भारत बुटलेकर,राकेश इतवारे आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला . 

No comments