दीड लाखांचे गोवंश मांस जप्त करीत केले नष्ट ४ अटकेत ४ फरार ; रावेर पोलीसांची कारवाई रावेर प्रतिनिधी -:- (संपादक -:- हेमकांत गायकवाड) रावे...
दीड लाखांचे गोवंश मांस जप्त करीत केले नष्ट ४ अटकेत ४ फरार ; रावेर पोलीसांची कारवाई
रावेर प्रतिनिधी -:-
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील रसलपूर गावात कुरेशी मोहल्ल्यात मरीमाता मंदिराच्या पाठीमागे सलीम उस्मान कुरेशी याच्या घरासमोर गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल केली जात असल्याची गुप्त माहिती रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांना मिळाली त्यांना मिळालेल्या गोपनीय खबरीवरुन पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचे एक पथक तयार केले पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे यांनी पोना कल्पेश आमोदकर, पोकॉ प्रमोद पाटील, पोकॉ सुकेश तडवी, पोकॉ श्रीकांत चव्हाण आदिंसह पथक रसलपूर गावात पोहचून संबंधित कत्तलखान्यावर पोलिसांनी छापा टाकला या दरम्यान एका मोकळ्या जागेत खाली बसून गोवंश जातीच्या जनावरांचे मांस कुऱ्हाडी आणि सुऱ्यांच्या साहाय्याने कापत असल्याचे ८ जण दिसून आले. पोलीसांना बघताच आठ जणांपैकी चार जणांनी पोबारा केला तर चौघे पोलीसांच्या तावडीत सापडले या कारवाईत पोलिसांनी सुमारे दीड लाख रुपये किंमतीचे ७४० किलो गोवंश मांस आणि कत्तलीसाठी वापरण्यात येणारी हत्यारांसह साहित्य जप्त केले आहे
अटक करण्यात आलेले शेख वसीम शेख कय्युम कुरेशी (वय २५), शेख शकील शेख कलीम कुरेशी (वय २४), शेख सलीम शेख उस्मान कुरेशी (वय ६०) यांना अटक करून ताब्यात घेण्यात आले आहे तर शेख अनिस शेख अय्युब कुरेशी (वय ३२, सर्व रा. कुरेशी मोहल्ला, रावेर) शेख नुरअहमद शेख सलीम कुरेशी, शेख फारुख शेख अय्युम कुरेशी, शेख समीर शेख कय्युम कुरेशी आणि शेख फरीद शेख शब्बीर कुरेशी हे संशयित फरार झाले आहे
जप्त केलेल्या मांसाचे नमुने तपासणीसाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सील करण्यात आले आणि पंचनामा करण्यात आला. जप्त केलेले मांस रावेर नगरपालिकेच्या मदतीने कचरा डेपोत नष्ट करण्यात आले.सदर प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत
No comments