चुंचाळे व बोराळ्यात महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) महान शुरवीर महाराण...
चुंचाळे व बोराळ्यात महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महान शुरवीर महाराणा प्रतापसिंह राणा यांनी दाखविलेल्या मार्गावर आपण सर्वांनी चालणे महत्वाचे असुन,महाराणा प्रतापांनी समाजाप्रती केलेल्या शौर्याची गाथा आजही तीतकीच प्रभावशाली ठरू पहात आहे.अत्यंत कमी वयातच त्यांनी अद्यम्य पराक्रम गाजवीला, त्यासाठी महाराणा प्रतापांचे कार्य आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतीपादन चुंचाळे येथील वि. का. सो चेअरमन सुनिल बाळकृष्ण नेवे यांनी महाराणा प्रताप जंयती निमीत्त केले.तरूणांनी व्यसनाधीनते कडे न झुकता शरीरसंपदा सांभाळावी असा सल्लाही यावेळी नेवे यांनी आपल्या मनोगणातून दिला. चुंचाळ्यात महाराणा प्रतापसिंह मित्र मंडळ जयंती उत्सव समितीमार्फत आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते.सामितीच्यावतीने विवीध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.भव्य शोभायात्रा, सरबत वाटप आदी कार्यक्रमांचा समावेश होता.येथील श्री समर्थ सुकनाथ बाबा चौकात महाराणा प्रताप जयती निमीत्त कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता यावल देखरेख संघाचे संचालक व वि. का. सो. चेअरमन सुनिल नेवे यांच्या हस्ते महाराणा प्रतापांच्या प्रतीमेचे पुष्पहार घालुन पुजन करण्यात आले तर माल्यार्पन उज्जैनसिंग राजपूत यानी केले संपुर्ण गावात वाजत गाजत मिरवणुक काढण्यात आली होती बोराळ्यात महाराणा प्रतापाच्या प्रतीमेचे पुजन बोराळे सरपंच संध्याताई उज्जैनसिंग राजपुत यांनी केले तर माल्यार्पन उज्जैनसिग राजपूत यांनी के़ले यावेळी सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल राजपूत ,भाजपाचे यावल तालुका संघटक उज्जैनसिंग राजपुत,नितीन पाटील,वि.का.सो.संचालक ज्ञानेश्वर पाटील,बोराळे येथील सज्जीवसिंग राजपुत,अमरसिंग राजपुत,कैलाससिंग राजपुत, पुनमसिग राजपूत,नितीन राजपूत ,वाय.वाय.पाटील,पप्पु पाटील,गोकुळ कोळी,दिपक पाटील, मयूर कोळी यांच्या सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी आदित्य राजपुत,बंटी राजपुत,पवन राजपुत,बापु राजपुत,निखिल राजपुत,शुभम राजपुत,वैभव राजपुत,प्रशांत राजपुत यांनी परिश्रम घेतले यावल पोलीस निरीक्षक प्रदिप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पाटील गणेश पाटील व माधुरी राजपूत यांनी चोख बंदोबस्त पाळला होता.

No comments