adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चितोडा उपकेंद्राच्या गलथान कारभाराविरोधात ग्रामस्थांचा संताप

  चितोडा उपकेंद्राच्या गलथान कारभाराविरोधात ग्रामस्थांचा संताप यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  यावल :- भालोद प्राथमिक आरोग्य...

 चितोडा उपकेंद्राच्या गलथान कारभाराविरोधात ग्रामस्थांचा संताप

यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 यावल :- भालोद प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या चितोडा येथील आरोग्य उपकेंद्रावर ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. उपकेंद्र वेळेवर उघडले जात नसून नेहमीच पावल्या वेळेनंतर उघडले जाते, तसेच तेथे येणाऱ्या रुग्णांशी कर्मचारी अरेरावीच्या वर्तनाने बोलत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

या समस्येबाबत अनेक वेळा संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करूनही कुठलाही ठोस उपाय करण्यात आलेला नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. नुकतेच तालुक्यात विविध ठिकाणी डेंग्यू आजारावर जनजागृती मोहीम राबवण्यात आली, मात्र चितोडा गावात मात्र याची कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही. या निष्काळजी कर्मचारी यांच्यावर कोणाचा वरदहस्त आहे की ते शासनाचे आदेश सुद्धा जुमानत नाहीत

ग्रामस्थांनी अशा निष्काळजी व गैरजबाबदार कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, तसेच सखोल चौकशी करून संबंधित कर्मचारी याला निलंबित करण्यात यावे, अशी जोरदार मागणी केली आहे.

No comments