adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनविसे रावेर लोकसभेचा वतीने मूकबधिर शाळा व अनाथाश्रमात सेवा कार्य

  महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनविसे रावेर लोकसभेचा वतीने मूकबधिर शाळा व अनाथाश्रमात सेव...

 महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनविसे रावेर लोकसभेचा वतीने मूकबधिर शाळा व अनाथाश्रमात सेवा कार्य


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रावेर लोकसभा मनविसे तर्फे सामाजिक बांधिलकी जपत मूकबधिर शाळा आणि अनाथाश्रम येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना आणि अनाथ बालकांना स्वादिष्ट भोजन वाटप करण्यात आले तसेच केक कापून अमित ठाकरे यांचा वाढदिवस आनंदाने साजरा करण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. या प्रसंगी मनविसे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष कल्पेश पवार, जिल्हा सचिव विष्णू कोळी, यावल तालुका अध्यक्ष ऋषिकेश पाटील, तालुका उपाध्यक्ष उदय पाटील, चोपडा तालुका अध्यक्ष गौरव सोनवणे,  किशोर महाजन व  योगेश कोळी यांची विशेष उपस्थिती लाभली.

हा सामाजिक उपक्रम मनविसेच्या युवकांनी स्वखुशीने पार पाडला असून, अशा प्रकारच्या उपक्रमांतून समाजातील दुर्लक्षित घटकांपर्यंत आनंद पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना नेहमीच अशा विधायक कार्यात अग्रेसर राहील, असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करण्यात आला.

No comments