Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहाने साजरी

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहाने साजरी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करताना आमदार अमोल दाद...

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहाने साजरी

अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करताना आमदार अमोल दादा जावळे व इतर मान्यवर

भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 यावल येथील  धनगर वाड्यात धनगर समाजातर्फे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती निमित्त आमदार अमोलदादा जावळे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्यावेळी कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त समाजातर्फे यावल शहरातून मेनरोडने भव्य मिरवणूक काढण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात म्हसोबा देवस्थान जवळील धनगरवाड्यात करण्यात आली. अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेची पूजा दीप प्रज्वलन करून करण्यात आली.यावेळी आमदार अमोलदादा जावळे,तालुका अध्यक्ष उमेश फेगडे,उपाध्यक्ष मुकेश कोळी यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह विशाल शिर्के,सागर धनगर,भरत धनगर,रवी धनगर, राजू धनगर,नितीन महाजन.धनगर समाज सर्व स्तरातील स्त्री पुरुष नागरिक तरुण पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments