adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ड्रायव्हरने चोरलेले सराफ व्यापा-याचे कोट्यावधीचे मौल्यवान सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश

  ड्रायव्हरने चोरलेले सराफ व्यापा-याचे कोट्यावधीचे  मौल्यवान सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश सचिन मोकळं अहि...

 ड्रायव्हरने चोरलेले सराफ व्यापा-याचे कोट्यावधीचे  मौल्यवान सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश



सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि२४):-शिर्डी येथून सराफ व्यापा-याचे चोरी झालेले 2,50,59,103/-रू किंमतीचे 2687 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने स्थानिक गुन्हे शाखेने तपास करून जप्त केले आहे.बातमीची हकिगत अशी की,फिर्यादी विजयसिंह वसनाजी खिश (वय 35,धंदा सोने व्यापारी,रा.आवाल घुमटी, ता.अमिरगढ,जि.बनासकाटा, गुजरात) हे होलसेल सोने विक्रीचा व्यवसाय करत असून ते शिर्डी,श्रीरामपूर,कोल्हार,सोनई व अहिल्यानगर येथील सराफ व्यावसायिकांकडे सोने विक्रीसाठी आले.दि.13 मे 2025 रोजी फिर्यादी व त्याचा ड्रायव्हर सुरेशकुमार भुरसिंह राजपुरोहित (रा.चौहटन, जि.बारमेर,राजस्थान) असे शिर्डी येथील हॉटेल साई सुनिता येथे मुक्कामी असताना ड्रायव्हरने 3,26,00,000/- रू किंमतीचे दागीने व रोख रक्कम चोरून घेऊन गेला.याबाबत शिर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं.532/2025 बीएनएस कलम 306, 316 (2) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल आहे.घडलेल्या घटनेची माहिती मिळताच तत्कालीन पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेस गुन्हयाचा तपास करणेबाबत सुचना दिल्या.त्यानुषंगाने पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई/तुषार धाकराव व पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे, संतोष लोढे,अरूण गांगुर्डे, किशोर शिरसाठ,अमृत आढाव, फुरकान शेख,प्रशांत राठोड व चंद्रकांत कुसळकर अशांचे पथक नेमुण चोरीचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.तपास पथकाने घटनाठिकाणी भेट देऊन, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे गुन्हयातील निष्पन्न आरोपीचा पुणे,मुंबई येथे आला.पथकाने आरोपीचे नातेवाईकांना विश्वासात घेऊन गुन्हयाचे गांभीर्य समजावून सांगुन आरोपी व गुन्हयातील मुद्देमालाबाबत काही माहिती प्राप्त झाल्यास कळविणेबाबत सांगीतले. दि.23 मे 2025 रोजी आरोपीचा भाऊ रमेशकुमार भुरसिंह राजपुराहित, वय 33, रा.इब्रे का ताला, ता.चोहटन, जि.बारमेर, राजस्थान हा स्थानिक गुन्हे शाखेत हजर होऊन त्याने गुन्हयातील मुद्देमाल हजर करत असलेबाबत कळविले.पथकाने पंचासमक्ष त्याचेकडे विचारपूस केली असता आरोपी सुरेशकुमार भुरसिंह राजपुरोहित याने दि.21 मे 2025 रोजी शिर्डी येथून चोरून आणलेले सोन्याचे दागीने बॅगमधुन आणुन घरी ठेवले व तो कोठेतरी निघुन गेल्याची माहिती दिली. पंचासमक्ष रमेशकुमार भुरसिंह राजपुराहित याने हजर केलेले 2,50,59,103/- रू किंमत त्यात 2687.361 ग्रॅम वजनाचे सोन्याचे विविध प्रकारचे दागीने (एसएनपी नग, टॉप्स, डुल, बाळी, मंगळसुत्र वाटया, लेडीज रिंग, राजमुद्रा रिंग) असा मुद्देमाल जप्त केला.गुन्हयाचे तपासकामी जप्त करण्यात आलेला मुद्देमाल शिर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे,श्री.राकेश ओला तत्कालीन पोलीस अधीक्षक,श्री.वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर,श्री.शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

No comments