सातारा जिल्ह्यात अवैध धंदे व्यवसायिकांवर कारवाई, तसेच महिला अत्याचाराचा तपास दुप्पट वेगाने करणार:- नूतन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची ठाम...
सातारा जिल्ह्यात अवैध धंदे व्यवसायिकांवर कारवाई, तसेच महिला अत्याचाराचा तपास दुप्पट वेगाने करणार:- नूतन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची ठाम ग्वाही..!
संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सातारा जिल्हा हा चार कॅबिनेट मंत्री असलेले हा जिल्हा आणि राजकीय तसेच ऐतिहासिक क्रांतिकारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो या जिल्ह्यामध्ये माझी नियुक्ती झाल्यामुळे हे माझं भाग्यच म्हणावे लागले अशा प्रतिक्रिया नूतन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली आहे. या जिल्ह्यामध्ये मी नेहमीच अवैध व्यवसायिकांवर माझी करडी नजर असेल तसेच महिलांवरील अत्याचारांचा तपास हा जलद गतीने करणार आहे. यापूर्वीचे हे पोलीस अधीक्षक समीर शेख जिल्ह्यामध्ये नेहमीच प्रयत्नशील राहिले, त्यांच्या पाठोपाठ सातारा जिल्ह्याची जबाबदारी माझ्याकडे आली असून मी ही जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार आहे, पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षक पदावरून या ऐतिहासिक आणि शूरवीरांचा जिल्ह्यात माझी नियुक्ती झाली हे माझे मोठे भाग्यच म्हणावे लागेल, सातारा जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक तुषार दोशी हे कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय आयपीएस अधिकारी म्हणून ओळखले जातात त्यांनी आत्तापर्यंत मुंबई सह जालना जिल्ह्यातही आपले उत्कृंष्ट सेवा दिली आहे. सातारा जिल्ह्यातही लोकाभिमुख काम करून पोलीस दलाची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे, असे नूतन पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली आहे

No comments