adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मुक्ताईनगर शहरात पीडब्ल्यूडीचा भोंगळ कारभार डिव्हायडरमध्ये लावलेल्या झाडांकडे दुर्लक्ष, पाण्याविना एकाच वर्षात सुकून कोरडे

  मुक्ताईनगर शहरात पीडब्ल्यूडीचा भोंगळ कारभार डिव्हायडरमध्ये लावलेल्या झाडांकडे दुर्लक्ष,  पाण्याविना एकाच वर्षात सुकून कोरडे   मुक्ताईनगर  ...

 मुक्ताईनगर शहरात पीडब्ल्यूडीचा भोंगळ कारभार

डिव्हायडरमध्ये लावलेल्या झाडांकडे दुर्लक्ष,  पाण्याविना एकाच वर्षात सुकून कोरडे  


मुक्ताईनगर  प्रतिनिधी सतीश गायकवाड

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

शहरातील प्रवर्तन चौक ते जुने गाव या मुख्य रस्त्याचे सौंदर्यीकरण एक ते दीड वर्षांपूर्वी करण्यात आले होते. यामध्ये आकर्षक विद्युत रोषणाईसह झाडांचेही वृक्षारोपण करण्यात आले होते. दिवाळीच्या सुमारास मोठ्या खर्चातून काम करण्यात आले असले तरी सध्या या झाडांची दयनीय अवस्था झालेली आहे. आधीच झाडे आयते आणले असून झाडे महिना दोन महिन्यासाठी लावले होते कां? उन्हाच्या तीव्रतेने वाढ झाल्यानंतर झाडांकडे कोणतेही लक्ष दिले गेले नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. परिणामी,अनेक झाडांचे कंबर्डे मोडले गेले आहे तर काही सुकून गेले आहे, या स्थितीमुळे रस्त्याच्या सौंदर्यला गालबोट लागले असून, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

जुने गाव परिसरातील रहिवाशांनी यावर संताप व्यक्त करत संबंधित प्रशासन आणि ठेकेदारावर कारवाईची मागणी केली आहे. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (पीडब्लूडी) ठेकेदाराला दिले गेले असल्याची माहिती असून शासनाने खर्च केलेल्या निधीचा योग्य उपयोग न झाल्याचे यावरून दिसून येते. नागरिकांनी प्रशासनाकडे विनंती केली आहे की, झाडांची त्वरित देखभाल करून शहराचे सौंदर्य व पर्यावरण रक्षण करण्यासाठी ठोस पावले उचलावीत. अन्यथा, आंदोलनाचा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे. आ. चंद्रकांत पाटील हे मुक्ताईनगर शहराचा कायापालट करतांना दिसून येत आहे शहरामध्ये विकास कामांची गंगाच वाहून आणली आहे. आमदार शहराच्या विकासासाठी चांगले काम करत आहे. यासाठी आमदार लागेल तो निधी आणत आहे. परंतु नुसते काम चांगले करण्याची देखील प्रशासनाची किंवा ठेकेदाराची इच्छा नसावी का, मुक्ताईनगर शहर हे सुंदर शहर व्हायला हवे, असे आमदारांचे स्वप्न आहे. परंतु अशा प्रशासनामुळे व ठेकेदारांमुळे आमदारांची निराशा होईल का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. यासंदर्भात पीडब्ल्यूडीचे अधिकारी श्री. बेंडकुळे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांचा फोन कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर दाखवत होता.

No comments