प्रहार तालुका प्रमुख अजित फुंदे,युवा तालुका प्रमुख अमोल बावस्कार यांना बाळासाहेब ठाकरे ऑलराऊंडर पुरस्कार प्रदान - नागरिकांच्या हक्कासाठी ...
प्रहार तालुका प्रमुख अजित फुंदे,युवा तालुका प्रमुख अमोल बावस्कार यांना बाळासाहेब ठाकरे ऑलराऊंडर पुरस्कार प्रदान - नागरिकांच्या हक्कासाठी लढत असल्याची सेवाकार्य पावती
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर:- गेल्या अनेक वर्षांपासून प्रहार जनशक्ती पक्ष मध्ये सेवेत कार्यरत असलेल्या प्रहार पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते मलकापूर तालुका प्रमुख अजित फुंदे व युवा तालुका प्रमुख अमोल बावस्कार यांना करत असल्येल्या त्यांच्या सामाजिक सेवा कार्याची दखल घेत प्रमिलाताई सभागृह अकोला येथे प्रहार जनशक्ती पक्ष संस्थापक मा.बच्चुभाऊ कडू यांच्या उपस्थित 'संताजी-धनाजी कार्यकर्ता पुरस्कार 2025 माध्यमातून बाळासाहेब ऑल राऊंडर पुरस्कार मा.बच्चुभाऊ कडू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.या पुरस्कार वितरण सोहळ्याला प्रहार कार्यकर्ते उपस्थित असून अजित फुंदे, अमोल बावस्कार यांनी आपल्या कार्यकाळात रुग्ण,अपंग, विद्यार्थी,शेतकरी,शेतमजूर, गरजूंना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने संघर्ष केला त्यांना त्यांच्या सेवाकार्याची पावती म्हणून बाळासाहेब ठाकरे ऑलराऊंडर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित मान्यवरांनीही अजित फुंदे,अमोल बावस्कार यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

No comments