अवैध वाळु वाहतुक करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर (दि३):- ...
अवैध वाळु वाहतुक करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि३):-बेलवंडी येथे अवैध वाळु वाहतुक करणाऱ्यां विरूध्द स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत आरोपीकडून तब्बल 20 लाख 50,000/-रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.पथकाने सदरील आरोपी विरूध्द बेलवंडी पोलीस स्टेशन गुरनं 148/2025 बीएनएस 2023 चे कलम 303 (2), 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून गुन्हयाचा पुढील तपास बेलवंडी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री.प्रशांत खैरे, अपर पोलीस अधिक्षक,श्री. विवेकानंद वाखारे उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत उपविभाग स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे,गणेश लोंढे,भाऊसाहेब काळे,अमोल कोतकर,बाळासाहेब खेडकर, आकाश काळे,मनोज लातुरकर व उमाकांत गावडे यांनी केलेली आहे.

No comments