adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रक्तगट व हिमोग्लोबिन मोफत तपासणी शिबिर प्रकल्प

  रक्तगट व हिमोग्लोबिन मोफत तपासणी शिबिर प्रकल्प  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मानवी शरीरात रक्त हे महत्त्वाचे असते म्हणून प...

 रक्तगट व हिमोग्लोबिन मोफत तपासणी शिबिर प्रकल्प 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मानवी शरीरात रक्त हे महत्त्वाचे असते म्हणून प्रत्येकाला आपला रक्तगट कोणता आहे हे माहित असणे आवश्यक आहे त्यासोबत आपल्या रक्तात किती प्रमाण हिमोग्लोबिन आहे हे सुद्धा माहिती असणे आवश्यक आहे कारण की या दोन्ही गोष्टी आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत म्हणूनच आपल्या  रोटरी क्लब ऑफ चोपडा ,सोनम कॉम्प्युटरराइस्ड क्लीनिकल लॅबोरेटरी व कै सौ सकवारबाई बहुउद्देशीय संस्था चोपडा यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र दिन व कामगार दिन औचित्य साधून 


दिनांक 1मे 2025 वार गुरुवार रोजी सकाळी 8 ते 12 या कालावधी ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज चौक चोपडा येथे रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी शिबिर आयोजित केले  होते व त्यात 126 लोकांचे हिमोग्लोबिन व रक्तगट तपासणी करण्यात आले त्यामुळे बऱ्याच लोकांना आपला रक्तगट माहिती झाला व महिला वर्गाला आपल्या शरीरात किती हिमोग्लोबिन आहे याची माहिती मिळाली 


यावेळी रोटे पी बी पाटील रावसाहेब प्रकल्प प्रमुख रोटे डॉ ईश्वर सौदाणकर अध्यक्ष रोटे बी एस पवार मानद सचिव रोटे नितीन अहिरराव  रोटे विलास कोष्टी रोटे चंद्रकांत साखरे रोटे रुपेश पाटील रोटे विपुल छाजेड रोटे आशिष जयस्वाल रोटे अरुण सपकाळे व रोटे नंदकिशोर पाटील हे उपस्थित होते व या प्रकल्पासाठी सोनम लॅबोरेटरी चे संचालक श्री भरत पाटील व त्यांचे परिवार यांनी मोलाचे सहकार्य केले

No comments