खडकी वाळकी परिसरात पूरपरिस्थिती,जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्याकडून मदतीची विनंती,तात्काळ लष्कराच्या मदतीने आपत्ती निवारण कार्य सुरु सचिन ...
खडकी वाळकी परिसरात पूरपरिस्थिती,जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्याकडून मदतीची विनंती,तात्काळ लष्कराच्या मदतीने आपत्ती निवारण कार्य सुरु
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.२७):-अविरत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अहिल्यानगर तालुक्यातील खडकी गावामध्ये गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.गावामध्ये पाण्याची पातळी कमरेपर्यंत पोहोचली असून,रहिवासी अडकून पडले आहेत.हे गाव सैन्याच्या आर्मर्ड कॉर्प्स सेंटर अँड स्कूल (ACC&S) पासून सुमारे २० किमी अंतरावर आहे.याठिकाणी लष्कराच्या वतीने मदतकार्य राबविण्यात येत आहे.जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्याकडून मदतीची विनंती प्राप्त झाल्यानंतर भारतीय सैन्याने तात्काळ ACC&S येथून एक मदत पथक तैनात करून बचाव व मदत कार्य सुरू केले.हे मदत पथक संध्याकाळी १७:३५ वाजता अरणगाव येथे पोहोचले आणि तेथील नागरी प्रशासनासोबत समन्वय साधून पुरग्रस्त भागाकडे रवाना झाले. १७:५० वाजता पथक खडकीनगर गावात दाखल झाले आणि तातडीने बचावकार्य सुरू केले आहे,अशी प्राथमिक माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून प्राप्त झाली आहे.

No comments