adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

उद्या दाताळा येथे मा.बच्चूभाऊ कडू यांची जाहीर सभा व कार्यकर्ता संवाद शेतकरी बांधवांनी उपस्थित रहा.... प्रहार जनशक्ती पक्ष

उद्या दाताळा येथे मा.बच्चूभाऊ कडू यांची जाहीर सभा व कार्यकर्ता संवाद शेतकरी बांधवांनी उपस्थित रहा.... प्रहार जनशक्ती पक्ष अमोल बावस्कार बुलढ...

उद्या दाताळा येथे मा.बच्चूभाऊ कडू यांची जाहीर सभा व कार्यकर्ता संवाद

शेतकरी बांधवांनी उपस्थित रहा.... प्रहार जनशक्ती पक्ष


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर:- विश्वासघाती महायुती सरकारने शेतकर्‍यांना विधानसभा निवडणुकीवेळी आश्वासने दिली, मात्र त्या आश्वासनांची पुर्तता ६ महिने उलटूनही करण्यात आली नाही. महायुती सरकारने शेतकर्‍यांची एकप्रकारे थट्टाच लावली असून या सरकारला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्राची मुलूखमैदानी तोफ, प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा.आ.बच्चूभाऊ कडू यांची जाहीर सभा व कार्यकर्ता संवादचे आयोजन २८ मे रोजी संध्याकाळी ०६:०० वाजता दाताळा येथे ग्रा.पं.कार्यालया समोर करण्यात आले आहे.

या जाहीर सभा व कार्यकर्ता संवाद मेळाव्याप्रसंगी महाराष्ट्र  प्रदेश अध्यक्ष बल्लूभाऊ जंजाळ, जिल्हा प्रमुख वैभवराजे मोहिते, जिल्हा संपर्क प्रमुख गजाननभाऊ लोखंडकार, जिल्हा उपप्रमुख अजय टप यांचेसह आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीवेळी महायुती सरकारने शेतकर्‍यांना, जनतेला अनेक आश्वासनांच खैरात वाटली. मात्र ती आश्वासने आता पुर्ण करण्याकडे पुर्णत: पाठ फिरविली आहे. शेतकर्‍यांचा पीक विमा, संपूर्ण कर्जमाफी ह्या ज्वलंत प्रश्नांना महायुती सरकार पुर्णत: दुर्लक्ष करीत असल्याने याचा आता रोष संपूर्ण महाराष्ट्रात उफाळून येत आहे. या कुंभकर्णी झोपेत असलेल्या महायुती सरकारला जागे करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा.आ.बच्चूभाऊ कडू यांनी शासनाच्या विरोधात एल्गार उगारला आहे. त्याच अनुषंगाने मागील काळा अनेक आंदोलनेही केली. तर आता विधानसभा निवडणुकीतील आश्वासनांप्रमाणे सर्व शेतकर्‍यांचे कर्ज सरसकट माफ करा, २०२३ आणि २०२४ च्या पीक विम्याची रक्कम तातडीने शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करा, शेतकर्‍यांवरील कर्ज वसुली थांबवून त्यांना नवीन कर्ज पुरवठा करा, खरीप व रब्बी हंगामासाठी सवलतीच्या दरात बियाणे, खते, औषध उपलब्ध करा, दिव्यांग, वृध्द, आणि निराधारांना मिळणारे अनुदान वेळेत वितरित करा यासह आदी प्रमुख मागण्यांसाठी बच्चूभाऊ कडू हे २८ मे रोजी दाताळा येथे आपली तोफ डागणार आहेत. 

तरी आयोजित या जाहीर सभा व कार्यकर्ता संवाद प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख अजित फुंदे,शहर प्रमुख शालीकराम पाटील, युवा तालुका प्रमुख अमोल बावस्कार,बळराम बावस्कर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

No comments