adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

श्री साईद्वारका ट्रस्टच्या रुग्णसेवेचे कार्य उल्लेखनीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा' अध्यक्ष ॲड.धनंजय जाधव

 श्री साईद्वारका ट्रस्टच्या रुग्णसेवेचे कार्य उल्लेखनीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा' अध्यक्ष ॲड.धनंजय जाधव...

 श्री साईद्वारका ट्रस्टच्या रुग्णसेवेचे कार्य उल्लेखनीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा' अध्यक्ष ॲड.धनंजय जाधव


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि२७):- नगर शहरात सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या श्री साईद्वारका ट्रस्टला पालकमंत्री कार्यालय येथे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते व मा.खा.सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या रुग्णवाहीकेचे नुकतेच नूतनीकरण सोहळा पार पडला.यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की,श्री साईद्वारका ट्रस्टचे रुग्णसेवेचे कार्य उल्लेखनीय आहे.शहरातील नागरिक,गरोदर महिला व गरजू रुग्णांना वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यादृष्टीने आरोग्य सेवेच्या बळकटीकरणावर भर देण्यासाठी खा.सुजय विखे पाटील यांनी श्री साईद्वारका सेवा ट्रस्ट ला रुग्णवाहीका उपलब्ध करुन दिली होती.ॲड.धनंजय जाधव यांच्या श्री साईद्वारका ट्रस्टचे कार्य अतिशय सामाजिक दृष्ट्या चांगले असून ट्रस्टच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.

त्यामुळे त्यांच्या कार्याला चालना मिळावी यासाठी त्यांना आपण रुग्णवाहीका उपलब्ध करून दिली होती,ती त्यांनी योग्यप्रकारे चालवली व आता त्यात काळानुसार बदल केले आहेत.

यावेळी बोलताना ट्रस्टचे अध्यक्ष ॲड.धनंजय जाधव म्हणाले की, अनेक वेळा गोरगरीब नागरिकांना घरीच त्रास होतो अशा वेळी रुग्णवाहिकेसाठी पैसेही नसतात मात्र अशा रुग्णांच्या नातेवाईक मित्रांनी फोन केला तर त्यांना दवाखान्यापर्यंत घेऊन जाण्याचे जबाबदारी 'श्री साई द्वारका सेवा ट्रस्ट' माध्यमातून उपलब्ध असणारी रुग्णवाहिका करत असून आतापर्यंत सातशे ते आठशे रुग्णांना सेवा देण्यात आली आहे.सध्याच्या परिस्थितीमध्ये रुग्णांना दवाखान्यापर्यंत पोहोचणे ही महत्त्वाची गरज असल्याने ती सेवा अल्पदरात मा.खासदार सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून मिळालेल्या रुग्णवाहिकेमुळे आम्ही देत आहोत.श्री साई द्वारका सेवा ट्रस्ट हे सर्वसामान्यांसाठी कार्यरत असून त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी 'रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा' आणि 'जनसामान्यांची सेवा हाच धर्म' या तत्वांवर चालणारे असून नेहमीच सर्वसामान्यांसाठी काम करीत राहील असे याप्रसंगी स्पष्ट केले.यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे,माजी उपमहापौर अनिलभाऊ बोरुडे,मा.नगरसेवक निखिल वारे,मा.नगरसेवक रामदास आंधळे,संजयभाऊ ढोणे,अजय चितळे,सतिश शिंदे,पल्लवी जाधव,मा.नगरसेवक रविंद्र बारस्कर,मा.नगरसेवक मनोज कोतकर,मनोज ताठे,करण कराळे,संपत नलावडे,भरत ठुबे,अमोल निस्ताने,राहुल मुथा आदी उपस्थित होते.

No comments