adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

एस.टी.कर्मचार्‍याला शिवीगाळ करत बेदम मारहाण कोतवालीत गुन्हा दाखल

  एस.टी.कर्मचार्‍याला शिवीगाळ करत बेदम मारहाण कोतवालीत गुन्हा दाखल सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर (दि.29):-मु...

 एस.टी.कर्मचार्‍याला शिवीगाळ करत बेदम मारहाण कोतवालीत गुन्हा दाखल



सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.29):-मुंबईहून जाफराबादकडे जाणार्‍या एस.टी.बसला प्रवासा दरम्यान वाहतूक कोंडीमुळे खूप उशीर झाल्याच्या कारणावरून बसमधील काही प्रवाशांनी वाहकाला शिवीगाळ व मारहाण केली.या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात शिवाजी भागवत सोनाळकर (वय ४०, रा. लाखनवाळा बु.ता.खामगाव, जि. बुलढाणा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बसमधील प्रवासी सोहम कर्पे याने वाहक सोनाळकर यांच्याकडे मला केडगाव बायपासवर सोडा,अशी मागणी केली.परंतु वाहकाने वाहतूक कोंडीमुळे उशीर होतो, असे सांगताच कर्पे याने व त्याच्या सोबत असणाऱ्या साथीदाराने बस वाहकास मारहाण केली.अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहे.

No comments