हिंगणा भोटा येथील ग्रामस्थांचे पुनर्वसनामध्ये उपोषण सुरू अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:-हेमकांत गायकवाड) नांदुरा:- हिंगणा भोटा या गावचे ...
हिंगणा भोटा येथील ग्रामस्थांचे पुनर्वसनामध्ये उपोषण सुरू
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
नांदुरा:- हिंगणा भोटा या गावचे पुनर्वसन जळगाव जामोद तालुक्यातील गाडेगाव शिवार येथे होत आहे त्यामुळे गावात होत असलेले पुनर्वसन यामध्ये काही प्रकारच्या त्रुटी असून त्या शासनाने मंजूर करावे तसेच गावातील तिन्ही बाजूने वॉल कंपाऊंड करणे नवीन गावठाण मधील सर्व 18 मीटर मीटरचे रोड काँक्रीट करून देणे
गावामध्ये ज्यांचा पक्का आठवा आहे त्यांना जागेचा मोबदला देऊन त्यांचे घर गावठाण हद्दीत घेणे नमुनाट अ वरील घरे व अतिक्रमित घरे ही क्लास घरे सर्वांचा मोबदला एक सोबत मिळणे नवीन गावठाण मधील वीर दुरुस्त करून मिळणे मुलांना स्पोर्टची जागा उपलब्ध करून देणे 62 फुटाचा रस्ता मशानभूमीपासून ते माऊली फाट्यापर्यंत करणे यासह इतर मागण्यांसाठी हिंगणा येथील उपसरपंच पती ज्ञानेश्वर काशीराम खवले सुनील साहेबराव खवले गुणवंत अजबराव खवले उपोषणाला बसले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी मनसे तालुका अध्यक्ष भागवत उगले हे सुद्धा उपोषण ठिकाणी हजार आहेत उपोषण त्यांना मनसेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला व यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास मनसे सुद्धा यांच्या न्याय हक्कासाठी मनसे स्टाईलने आंदोलन करील अशी माहिती म्हणजे तालुका अध्यक्ष भागवत उगले यांनी दिली आहे
No comments