मलकापूर नगर परिषदेला मुख्याधिकारी म्हणून रामकृष्ण जाधवर राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसादराव जाधव यांच्या मागणीला यश अमोल बावस्कार बु...
मलकापूर नगर परिषदेला मुख्याधिकारी म्हणून रामकृष्ण जाधवर राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसादराव जाधव यांच्या मागणीला यश
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
मलकापूर:- मलकापूर नगर परिषदमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कायम मुख्याधिकारी नसल्याने नागरी मुलभूत सुविधांसह साफसफाई व न.प.तील प्रशासकीय कामांवर प्रचंड विपरीत परिणाम झाला होता. त्याकरीता न.प.ला कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद नारायणराव जाधव यांनी पालकमंत्री ना.मकरंद पाटील यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत ना.पाटील यांनी १९ मार्च २०२५ रोजी उपमुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे यांना पत्र देवून उचित कार्यवाहीबाबत कळविले होते. तर प्रधान सचिव नगरविकास यांना यावर त्वरीत कार्यवाही करण्याचे निर्देश ना.शिंदे यांनी दिले होते. त्यावरून काल ३० मे रोजी मलकापूर नगर परिषदेला मुख्याधिकारी म्हणून रामकृष्ण जाधवर यांची नियुक्ती करण्यात आली असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसादराव जाधव यांच्या पाठपुराव्याने मलकापूर न.प.ला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळाला आहे.
राकाँ नेते प्रसाद जाधव यांनी १८ मार्च रोजी बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.मकरंद जाधव यांच्याकडे मलकापूर नगर परिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्यात यावा अशी मागणी प्रत्यक्ष भेटून मुंबई येथे मंत्रालयात केली होती. मलकापूर नगर परिषदेला गेल्या काही महिन्यांपासून कायम मुख्याधिकारी नसल्याने नागरी मुलभूत सुविधा ठप्प झाल्या होत्या. तर न.प.तील अनेक अधिकारी, कर्मचार्यांच्या बदल्या झाल्या. त्याठिकाणी नवीन अधिकारी, कर्मचारी रूजू झाले. मात्र त्यांना पाहिजे त्या प्रमाणात न.प. प्रशासनाची व प्रशासकीय बाबींची माहिती नसल्यामुळे नागरी मुलभूत सुविधा, साफसफाई, न.प. तील प्रशासकीय कामांवर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होत असल्याबाबतचे निवेदन त्यांनी दिले होते.
या निवेदनाची तात्काळ दखल घेत पालकमंत्री ना.मकरंद पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री ना.एकनाथराव शिंदे यांच्याकडे याबाबत उचित कार्यवाही करण्याचे कळविले होते. तर ना.शिंदे यांनी याबाबत प्रधान सचिव नगरविकास यांना यावर त्वरीत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. तर काल ३० मे रोजी मलकापूर नगर परिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी म्हणून रामकृष्ण जाधवर यांची नियुक्ती करण्यात आल्याने मलकापूर न.प.च्या मुख्याधिकारी पदाचा प्रश्न हा पालकमंत्री ना.मकरंद जाधव यांच्या तत्परतेमुळे व राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसादराव जाधव यांनी केलेल्या मागणी व पाठपुराव्यामुळे मार्गी लागला आहे.
No comments