किनगाव इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूलची १००% निकालाची परंपरा कायम भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी. (संपादक -:- हेमकांत गायकवाड) किनगावं डोणगाव...
किनगाव इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूलची १००% निकालाची परंपरा कायम
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
किनगावं डोणगावं रोडवरील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलच्या इ.१० वीच्या विद्यार्थ्यांनी गेल्या अकरा वर्षांपासून ची १०० टक्के निकालाची परंपरा यावर्षीही कायम राखली आहे.नुकत्याच जाहीर झालेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या निकालानुसार प्रविष्ट झालेल्या १३७ विद्यार्थ्यांपैकी देव संजय पाटील याने ९२.४०% गुण मिळवून प्रथम क्रमाक पटकवला व ईशिता विनय महाजन हिने ८९.८०% गुण मिळवून द्वितीय तर तेजस ज्ञानेश्वर सपकाळे ८९% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उतीर्ण झाले.तसेच स्कुलच्या उर्वरित सर्व विद्यार्थ्यांनी ७५% पेक्षा जास्त गुण मिळवून विशेष प्राविण्य मिळविलेले आहे. गुणवंत सर्व विद्यार्थ्यांचे चेअरमन; विजयकुमार देवचंद पाटील सचिव मनिष विजयकुमार पाटील, मुख्याध्यापक अशोक प्रतापसिंग पाटील, उपमुख्याध्यापक सुहास भालेराव व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments