यावल तहसील कार्यालयातर्फे किनगाव येथे आधारकार्ड पडताळणी शिबीर. भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक हेमकांत गायकवाड) आमदार अमोल हरिभाऊ जाव...
यावल तहसील कार्यालयातर्फे किनगाव येथे आधारकार्ड पडताळणी शिबीर.
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक हेमकांत गायकवाड)
आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या संकल्पनेतून व सुचनेनुसार किनगावसह परीसरातील संजय गांधी श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना आधार कार्ड सह विविध तांत्रिक अडचणींमुळे निधी मिळण्यास येत असलेल्या अडचणींची समस्या सोडवण्यासाठी किनगाव येथे यावल तहसील कार्यालयामार्फत शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते या शिबिरात परिसरातील जे लाभार्थी लाभांपासून वंचित आहेत ते आपल्या समस्या सोडवण्यासाठी येथे आले होते व महसूल विभागाचे कर्मचारी यांनी सर्व लाभार्थ्यांच्या समस्यांचे निवारण केले जि.प.मराठी शाळा किनगाव येथे घेण्यात आलेल्या या शिबीरासाठी मंडळ अधिकारी ए.एल.पाटील ग्राम म. अधिकारी एम.पी.खुर्दा,किनगाव बु। ए.ए.राऊत,किनगाव खु। बि.जी.सुर्यवंशी,चिंचोली सी.सी.झटके नायगाव, के. के.तडवी, आडगाव महसूल सेवक गणेश वराडे, किनगाव, ज्ञानेश्वर सोळंके,चिंचोली युवा प्रशिक्षणार्थी डिगंबर सुरवाडे,किनगाव,मनिषा बाविस्कर,किनगाव संजय गांधी योजनेच्या अव्वल कारकून वैशाली मधूकर पाटील व ऑपरेटर भुषण मोहनदास सोनार यांनी परिश्रम घेतले तसेच संजय गांधी योजना विभागाचे नायब तहसीलदार मनोज खारे यांनीही या शिबीरात पाहणी केली तर या शिबीराच्या यशस्वीतेसाठी अपंग सेलचे अध्यक्ष अरुण शामराव पाटील,नायगाव व माजी प.स.सदस्य रविंद्र ठाकूर,किनगाव यांचे सहकार्य लाभले

No comments