ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन किरण धायले मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ...
ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
किरण धायले मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालय अंतुर्ली येथे आधुनिक भारताचे निर्माता व माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करताना अध्यक्ष एस ए भोईसर,हाजी सलीम मंत्री, काशिनाथ महाजन,देविदास मानकरे ,अनिल वाडीले, किरण धाय ले ,अनिल न्हावकर वाचक व मान्यवर.
आधुनिक भारताचे निर्माते व माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी हे दूरसंचार व संगणक क्रांतीचे जनक भारताचे सातवे पंतप्रधान होते. इंदिरा गांधी व फिरोज गांधी यांचे ज्येष्ठ सुपुत्र होते. राजीव गांधी हे नेहरू घराण्यातील तिसरे पंतप्रधान होते. जेव्हा राजीव गांधींनी पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतली तेव्हा ते भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले. (वय 40 वर्ष) .21 मे 1991 रोजी सकाळी दहा वाजता तामिळनाडूतील श्री पेरूमबुदुर येथे प्रचारादरम्यान आत्मघाती हमला डिप्रेशन टायगर ऑफ तामिळईलम ने केला व त्यांची प्राणज्योत मालवली.

No comments