कर्जबाजारीपणाला कंटाळून चमगाव येथे शेतकऱ्याची आत्महत्या; शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबता थांबेना शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार कधी ? विकास पा...
कर्जबाजारीपणाला कंटाळून चमगाव येथे शेतकऱ्याची आत्महत्या; शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबता थांबेना
शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार कधी ?
विकास पाटील धरणगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
धरणगाव : तालुक्यातील चमगाव येथे 19 मे रोजी शेतात विषारी द्रव्य प्राशन करून धनराज योगराज सावंत (पाटील) यांनी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास आपल्या गावाजवळच्या शेतात कांदा चाळीजवळ शेतातील विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. शेतातील नापिकीमुळे अवकाळी व दुष्काळीमुळे शेतकऱ्यांचे जीवन अत्यंत वाईट झाले आहे. धनराज योगराज सावंत यांच्यावर बँकेचे पाच ते सात लाख रुपये कर्ज होते हे कर्ज फेडायचे कसे या विवंचनेत ते होते या नैराश्यातून त्यांनी विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपविले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने त्यांच्या परिवारावर दुःखाच्या डोंगर कोसळलेला आहे. धनराज पाटील हे अत्यंत मनमिळाऊ व मितभाषी होते त्यांच्यावर 19 रोजी जळगाव सिविल हॉस्पिटल येथे अति दक्षता विभाग ला उपचार सुरू होते. दिनांक 20 रोजी त्यांनी मृत्यू शी झुंज देताना शेवटच्या श्वास घेतला. त्यांच्या मृत्युचे वृत्त कळताच संपूर्ण गावावर व परिसरात शोक कडा पसरली. याप्रकरणी धरणगाव पोलीस अकस्मात मृत्यू ची नोंद करण्याचे काम सुरू होते.

No comments