" शेतकरी आत्महत्या वाढीसाठी योजना म्हणजे नवीन पिक विमा योजनेत पैसे वाचवा व पायाभूत ला द्या,यालेच म्हणतस"दुःख हेलाले आणि डाव पखालल...
" शेतकरी आत्महत्या वाढीसाठी योजना म्हणजे नवीन पिक विमा योजनेत पैसे वाचवा व पायाभूत ला द्या,यालेच म्हणतस"दुःख हेलाले आणि डाव पखालले ... ...एस बी नाना पाटील.
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
.... _खानदेशात पूर्वी नदीवरून पाणी वाहायला रेडा वापरायचे व त्यावर पाणी भरायला जी पिशवी असायची तीला पखाल म्हणायचे.काही विद्वान रेड्याचे पायाला दुखापत झालेली आहे म्हणून पखाल ला डाव ठेवू असे सांगायचे व त्याचे फायदे सांगायचे,अर्थात जनता हसायची म्हणून वरील म्हण प्रचलित झाली._
आता एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात पीक उगवले नाही किंवा अती/कमी पावसाने त्या शेतातील पिक खराब झाले व त्याचे नुकसान झाले ते राज्यातील दुसऱ्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घ्यायला किंवा शेड बांधायला जास्त पैसे दिले म्हणून या शेतकऱ्यांचे पीक नुकसानं कसे भरून निघेल?म्हणज जो मरतो आहे त्याला लवकर मरू द्या, व पोट भरलेल्या व्यक्तीस.काय गम्मत आहे?
सरकारने जो पायाभूत साठी शासन निर्णय काढलेत त्यात " पिक विमा योजनेत वाचणारे पैसे पायाभूत साठी वापरणार असे स्पष्ट म्हटले आहे."
_ जे शेतकरी नाही ते मंत्री सोडा,पण शेतकरी कुटुंबात जन्मलेले मंत्र्यांना शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा देणाऱ्या योजना आधी पासून होत्या हे माहीत नव्हत का?त्यात वाढ करायची तर व्यक्तिगत शेतकरी आत्महत्या रोखणारी "पिक विमा योजना"तील हवाच काढून घेवून,जर असे म्हणत असतील की हे शेतकऱ्यांचे फायद्याचे आहे तर याबाबत न बोललेलेच बरे.लाडकी बहिण साठी पैसे उभे करतात, मग शेतकऱ्यांसाठी पण करा,पण त्यांना मारायचे हे योग्य नाही.
पिक विमा योजना ही व्यक्तिगत नुकसान झाल्यास ते भरून निघण्यासाठी सुरू झाली तिला तुम्ही छेद देऊन राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसानच करीत आहात असे नाही तर संकट काळात धीर मिळाल्या मुळे थांबलेल्या आत्महत्या वाढीसाठी हे जबाबदार राहील व हे पाप आहे.
महाराष्ट्र सरकारने "नमो शेतकरी योजना"सुरू केली होती तिचे हफ्ते केंद्राचे "शेतकरी सन्मान योजना"सोबत द्यायचे ठरवले होते ते देखील गेल्या हफ्तापासून दिलेले नाहीत.सरकार व विरोधी पक्षाचे सारे लाडकी बहिण योजना विषयी बोलतात पण शेतकऱ्यांच्या योजना गुंडाळल्या जात आहेत त्याविषयी गुपचूप का आहेत?हे ही अनाकलनीय आहे.
_हळू हळू साऱ्याच शेतकरी लाभाच्या योजना बंद करणे हे सरकारचे धोरण..कारण शेतकरी एकत्रित होऊ शकत नाही हा त्याला शाप आहे.

No comments