adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

२१ वर्षानंतर पुन्हा भरली हिंगोणा विद्यालयात माजी विद्यार्थ्यांची शाळा

  २१ वर्षानंतर पुन्हा भरली हिंगोणा विद्यालयात माजी विद्यार्थ्यांची शाळा शेतकी प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालयातील गुरुजनांचा केला गौरव  चो...

 २१ वर्षानंतर पुन्हा भरली हिंगोणा विद्यालयात माजी विद्यार्थ्यांची शाळा

शेतकी प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालयातील गुरुजनांचा केला गौरव 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

चोपडा-हिंगोणे तालुका चोपडा येथील शेतकी प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालयातील सन २००१-२००२ चे माजी विद्यार्थी व शिक्षक यांची तब्बल २१ वर्षानंतर भेट झाली. यावेळी उपस्थित शिक्षक व विद्यार्थी यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळीच अनुभूती निर्माण झाली. प्रथम सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षक अब्दुल पटेल ,उपेंद्र पाटील ,माध्यमिक शिक्षक ए. आर. पाटील, वाय.एस.पाटील , व्ही.सी‌. महाजन सर यांचे गुरुपूजन केले नंतर सर्व शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या हस्ते शाल- श्रीफळ ,बुके व फोटो फ्रेम भेट देऊन सत्कार करण्यात आला. नंतर सर्व शिक्षक व निवडक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्व विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून दिला. आठवणी जागृत करण्यासाठी शिक्षकांनी माजी विद्यार्थ्यांना अध्यापन केले. संगीत खुर्ची हा खेळ घेण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पूनम पाटील, सुवर्णा जैन, सुनीता पाटील, भावना पाटील, सोनाली पाटील, अश्विनी पाटील, अश्विनी ज्ञानेश्वर पाटील ,रेखा धनगर ,तिरमा पावरा ,भगवती सूर्यवंशी, समाधान पाटील ,दिनेश पाटील, रतिलाल पावरा, नारायण धनगर, सागर पाटील, सुनील भिल, विकास भिल, जितेंद्र धिवर प्रमोद पाटील ,नितीन पाटील यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सुवर्णा जैन यांनी केले. स्नेहभोजन करून कार्यक्रम संपन्न झाला.

No comments