adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बुद्ध पौर्णिमेनिमित्त निलक्रांती चौक मित्र मंडळातर्फे नागरिकांना थंडगार शितपेय आणि सरबताचे वाटप,या माध्यमातून सामाजिक ऐक्याचा एक मोलाचा संदेश देण्याचा प्रामाणिक प्रयत्न-ॲड. संदीप पाखरे

  बुद्ध पौर्णिमेनिमित्त निलक्रांती चौक मित्र मंडळातर्फे नागरिकांना थंडगार शितपेय आणि सरबताचे वाटप,या माध्यमातून सामाजिक ऐक्याचा एक मोलाचा सं...

 बुद्ध पौर्णिमेनिमित्त निलक्रांती चौक मित्र मंडळातर्फे नागरिकांना थंडगार शितपेय आणि सरबताचे वाटप,या माध्यमातून सामाजिक ऐक्याचा एक मोलाचा संदेश देण्याचा प्रामाणिक प्रयत्न-ॲड. संदीप पाखरे 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि१३):-बुद्ध पौर्णिमेनिमित्त शहरातील निलक्रांती चौक मित्र मंडळातर्फे नागरिकांना यंदाही दरवर्षी प्रमाणे थंडगार शितपेय आणि सरबताचे वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमास ॲड. संदीप पाखरे (नोटरी पब्लिक भारत सरकार),शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, सलीम शेख,मेजर कैलास ठुबे, अशोक पारधे,अमोल पाडळे, अक्षय साळवे,रामा साळवे, अमोल साळवे,संदीप साळवे आदी उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना ॲड.संदीप पाखरे म्हणाले की,निलक्रांती चौक मित्र मंडळ नेहमीच सामाजिक कामात कायम अग्रेसर असते, तथागत गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त दरवर्षी सामाजिकतेची जाणीव ठेवून विविध उपक्रमाद्वारे आणि अत्यंत धार्मिकपणे बुद्ध पौर्णिमा आनंदाने साजरी केली जाते. निलक्रांती चौक मित्र मंडळाकडून नेहमीच अशा कार्यक्रमाद्वारे समाजाला एक आदर्श वाटेल याप्रमाणे सामाजिक ऐक्याचा एक मोलाचा संदेश देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातो.प्रथमता महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यांना उपस्थित सर्वांच्या वतीने अभिवादन करून बुद्ध वंदना घेण्यात आली.तदनंतर थंडगार शितपेय आणि सरबताचे वाटप करण्यात आले.हा

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश गायकवाड,विजय साळवे, यश साळवे,किरण भादवे,रोहित शिरसाठ,मनोज साळवे,सुजित साळवे,प्रवीण भिंगारदिवे,रोहित साळवे,प्रशांत भोसले आदींनी परिश्रम घेतले.

No comments