adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भारतीय सेनेच्या सन्मानार्थ निघालेल्या तिरंगा यात्रेत उसळला जनसागर पाचशे फुट तिरंगा सर्वाचे लक्ष वेधुन घेत होते राजकिय,शासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते

  भारतीय सेनेच्या सन्मानार्थ  निघालेल्या तिरंगा यात्रेत उसळला जनसागर पाचशे फुट तिरंगा सर्वाचे लक्ष वेधुन घेत होते  राजकिय,शासकीय अधिकारी कर्...

 भारतीय सेनेच्या सन्मानार्थ  निघालेल्या तिरंगा यात्रेत उसळला जनसागर

पाचशे फुट तिरंगा सर्वाचे लक्ष वेधुन घेत होते 

राजकिय,शासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते 


चोपड़ा (प्रतिनिधि)

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जे धाडस दाखवत ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवलं, त्यातून आपली सेना केवळ शौर्यवानच नव्हे तर अतुलनीय आहे, हे पुन्हा सिद्ध झालं.या यशाच्या पार्श्वभूमीवर, आपल्या भारतीय सेनेच्या सन्मानार्थ चोपडा शहरात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. या यात्रेत   यांच्यासह हजारो चोपडेकर उत्स्फूर्तपणे सहभागी होत आम्ही सर्व एक असल्याचा संदेश दिला.यावेळी चोपडा तालुक्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा व माजी सैनिकांचा चोपडेकराच्या वतीने सत्कार करण्यात आला. सदर तिरंगा यात्रेत चोपडा शहर व ग्रामीण भागातील असंख्य देशप्रेमी नागरिक, युवक-युवती, माता-भगिनी आणि लहानग्यांनी प्रचंड उत्साहाने भाग घेतला. प्रत्येकाच्या डोळ्यांत देशासाठी अभिमान होता, ओठांवर ‘भारत माता की जय’चा जयघोष होता आणि हाती अभिमानाने फडकणारा तिरंगा होता!

यावेळी आमदार चंद्रकांत सोनवणे मनोगतात सांगितले की, भारतीय सेना आहे म्हणून आपण सुरक्षित आहोत. त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देता कामा नये. चला, एकजुटीने देशप्रेमाचे तेज जपूया, आणि भविष्यासाठी निर्धार बाळगूया – दहशतवादाला ठोस प्रत्युत्तर देणार्‍या भारताच्या बाजूने खंबीरपणे उभं राहूया! असे आवाहन केले.

 यावेळीआमदार प्रा चन्द्रकान्त सोनवणे, माजी विधानसभा अध्यक्ष माजी आमदार कैलास बापू पाटील माजी आमदार सौ.लताताई सोनवणे, जिल्हा बँकेचे संचालक घनश्याम अग्रवाल कृषी उत्पन्न बाजार समितीचे नरेंद्र पाटील भाजपा तालुकाध्यक्ष नरेंद्र पाटील मनसेचे अनिल वानखेडे सौ.इंदिराताई पाटील चंद्रहासभाई गुजराती, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अमृतराज सचदेव, तहसीलदार भाऊसाहेब थोरात,कृषि उत्तन्न भाजपाचे राकेश पाटिल,भटू पाटिल, नरेश महाजन, आबा देशमुख, राजू देशमुख,भाजपाचे संजय श्र्।वगी, माजी सैनिक ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाचे संचालिका पुरुष व महिला मोठ्या प्रमाणात हजर होत्या सर्वच राजकीय पक्ष,तसेच सर्वच सरकारी कार्यलयातील कर्मचारी एकत्र आलेल्या दिसत होते या रॅलीला विश्रामगृह पासून सुरुवात झाले तर बस स्टॅन्ड छत्रपती शिवाजी महाराज चौक

 येथे महाराजचा पूतळयाला माजी सैनिकानी माल्यर्पण करण्यात आले चौक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूतल्याला देखील माल्यार्पण करण्यात आले. येथून मेन रोड गोल मन्दिर, गुजराथी गल्ली , चिच चौक, थाळनेर चौक, गांधी चौक येथे गांधी गांधी पुतळ्यासमोर समारोप करण्यात आला यावेळी महाराष्ट्र गीत,राष्ट्र गीत झाल्या नतर रॅलीचे समारोप करण्यात आले

No comments