आरोग्य यंत्रणेतील संबंधित कर्मचारी व अधिकारी यांचेवर कारवाई साठी जिल्हा प्रशासन निघाले घटनास्थळी ७ कि.मि.पायी लाडक्या बहिणीची रस्त्यावरचं प...
आरोग्य यंत्रणेतील संबंधित कर्मचारी व अधिकारी यांचेवर कारवाई साठी जिल्हा प्रशासन निघाले घटनास्थळी ७ कि.मि.पायी
लाडक्या बहिणीची रस्त्यावरचं प्रसुती, अर्धा तास रुग्णवाहिका आलीच नाही
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपड्या तालुक्यातील वैजापूर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या बोरमळी गावाच्या नजीकच ॲम्बुलन्स मिळत न पोचल्यामुळे महिलेची रस्त्यातच प्रसुती झाल्याची व्हिडिओ बातमी प्रसारमाध्यमावर प्रसारित होताच शासनाला जाग? आली आणि आज दिनांक २८/०५/२०२५ जळगांव जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेचे दुर्लक्ष ग्रामपंचायत मेलाने अंतर्गत खैऱ्यापाणी ता.चोपडा जि.जळगांव येथील संत्रीबाई बन्सीलाल पावरा आदिवासी महिलेची ॲम्ब्युलन्स अभावी रस्त्याच्या कडेला प्रसूती झाल्याने पेशंट ला भेटी करण्यासाठी व जबाबदार आरोग्य यंत्रणेतील संबंधित कर्मचारी व अधिकारी यांचेवर कारवाई साठी जिल्हा प्रशासन यांनी घटना स्थळी ७ कि.मि.पायी निघाले
यावेळी उपस्थीत आयुष प्रसाद(जिल्हाधिकारी जळगांव)मीनल करणवाल(मुख्यकार्यकारी अधिकारी,जळगांव) अरुण पवार (प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल) भाऊसाहेब थोरात (तहसीलदार चोपडा)प्रमोद पाटिल (सहापोनि.अडावद पोलिस स्टेशन) कावेरी कमलाकर(पोनि.चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन चोपडा)पंचायत समिति गटविकास अधिकारी,तलाठी,कर्मचारी,ग्रामपंचायत सरपंच प्रताप पावरा,बोरमळी सरपंच प्रलहाद पाडवी,पोलीस पाटिल मेलाणे शिवाजी पावरा,खैऱ्यापाणी पोलीस पाटिल अमाशा पावरा,आदी उपस्थित होते.
No comments