adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांची बृहन्मुंबई पोलीस उप आयुक्त पदी बदली, सातारा जिल्ह्यात नेहमीच प्रयत्नशील राहिले

  सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांची बृहन्मुंबई पोलीस उप आयुक्त पदी बदली, सातारा जिल्ह्यात नेहमीच प्रयत्नशील राहिले   संभाजी पुरीगोसावी (सा...

 सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांची बृहन्मुंबई पोलीस उप आयुक्त पदी बदली, सातारा जिल्ह्यात नेहमीच प्रयत्नशील राहिले



 संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 सातारा जिल्ह्याचे आदरणीय जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पोलीस अधीक्षक म्हणून सातारा जिल्ह्याची सूत्रे हाती घेतल्यापासून पोलीस अधीक्षक नेहमीच प्रयत्नशील राहिले, जवळपास जिल्ह्यात त्यांनी ऐतिहासिक जिल्हा गुन्हेगारीमुक्त चांगलाच केला होता. सण उत्सव पालखी सोहळा तसेच आगामी निवडणुका अतिशय पारदर्शकता त्यांनी चांगलीच ठेवली होती. सातारा जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचाऱ्यासमवेत नेहमीच प्रयत्नशील राहिले, सातारचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून तुषार दोशी यांची नियुक्ती करण्यात आली असून तत्कालीन पोलीस अधीक्षक समीर शेख यांची बृहन्मुंबई पोलीस उप आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. राज्य सरकारने 22 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी काढले आहेत. लोहमार्ग पुणे येथून पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांचे सातारा पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सातारा जिल्ह्यात पोलिस दलाचे कुटुंब प्रमुख म्हणून अतिशय चांगल्याच पद्धतीने काम केले त्यांनी सातारकरांच्या जनतेमध्ये एक वेगळाच ठसा उमटवला होता. रेकॉर्ड ब्रेक पिस्तूल जप्त करणे, चोरीचे दागिने रिकव्हर करणे, शिवाय तरुण-तरुणीसाठी उंच भरारीच्या माध्यमातून अनेकांना नोकऱ्या मिळवून देणे हे आगळेवेगळे काम त्यांनी केले होते. जिल्ह्यातील गुंडांच्या टोळ्यांना तडीपार केले तसेच अनेकांना मोक्का लावून सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारी मुक्तता करण्यासाठी त्यांनी चांगलेच प्रयत्न केले होते. जिल्ह्यात सहाय्यक पोलीस अधीक्षक ते पोलीस अधीक्षक म्हणून देखील त्यांनी आपली उत्कृंष्ट सेवा सातारा जिल्हा वासियांना दिली, सातारा जिल्ह्याचा त्यांना दांडगा अभ्यास होता. गडचिरोलीसारख्या ठिकाणी काम करून आल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रांतील अत्यंत महत्त्वाचा असलेला सातारा जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून माझी दि. 22 ऑक्टोंबर 2022 पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. सातारा जिल्ह्याचे राजकीय तसेच ऐतिहासिक महत्त्व फार मोठे असल्याने तसेच क्रांतिकारी जिल्हा असल्याने येथे काम करण्याचे मोठे आव्हान समोर होते. मात्र जिल्ह्याची माती अन् माणसं खूप प्रेमळ तसेच कामाची कदर करणारे असल्याने काम करताना खूप आनंद मिळाला

No comments