adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

विनामूल्य माती परीक्षण तपासणी शिबिर

  विनामूल्य माती परीक्षण तपासणी शिबिर  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) भारत कृषीप्रधान देश असून आर्थिक कणा हा शेतीवर अवलंबून आहे...

 विनामूल्य माती परीक्षण तपासणी शिबिर 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

भारत कृषीप्रधान देश असून आर्थिक कणा हा शेतीवर अवलंबून आहे शेती करत असताना नेहमी रासायनिक खतांचा वापर हा मोठ्या प्रमाणात होत असतो परंतु आपल्या शेतातील मातीची पोत कोणती आहे, शेतात कोणते पिक घेतले पाहिजे हे शेतकऱ्याला माहीत नसते आपल्या शेतीच्या मातीत ही कोणते मूलद्रव्य अपूर्ण आहेत व कोणते परिपूर्ण आहेत हे शेतकऱ्याला कळाले तर ते आपल्या खतांमध्ये  योग्य. ते वापर करून जे अपूर्ण आहे तेच खत घेऊन जमिनीची पोत सुधारू शकतात म्हणूनच हा प्रश्न समजून सांगण्यासाठी व माती परीक्षण तपासणी शिबिर विनामूल्य आयोजित करण्यासाठी आपला एक प्रयत्न यात 


रोटरी क्लब ऑफ चोपडा राष्ट्रीय केमिकल अँड फर्टीलायझर लिमिटेड (आरसीएफ), व चहार्डी विविध कार्यकारी सोसायटी व श्री शिवाजी विविध कार्यकारी सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानाने 29 एप्रिल 2025 वार मंगळवार रोजी संध्याकाळी ठीक 6.00 वाजता महादेव मंदिर झाडण चौक चहार्डी येथे 66 शेतकरी बंधूंनी माती परीक्षणासाठी ह्यावेळी रसीएफ अधिकार्‍यांनी आपल्याकडे मायक्रो न्यूट्रिएंट्स व जमिनीतील मातीची तपासणीनंतर होणारे बदल व उत्पन्नात कशा पद्धतीने वाढ होते याबद्दल सखोल असे ज्ञान शेतकरी बांधवांना दिले व शेतकरी बांधवांनी या ज्ञानाचा उपयोग करून भविष्यात आम्ही उत्पन्न निश्चित वाढू अशा पद्धतीची ग्वाही दिली यावेळी सूत्रसंचालन श्री संजय बारी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री भालचंद्र शिवाजी पवार यांनी केले

रोटरी क्लब ऑफ चोपडा,राष्ट्रीय केमिकल अँड फर्टीलायझर लिमिटेड (RCF) व कृषी तंत्र विद्यालय अडावद  यांच्या संयुक्त विद्यमानाने  


दिनांक 3 मे 2025 वार शनिवार रोजी संध्याकाळी ठीक 6.00 वाजता ठिकाण :-  कृषी तंत्र विद्यालय अडावद येथे 88 शेतकऱ्यांनी आपले मातीचे नमुने परीक्षणासाठी दिले ह्यावेळी कृषी विभागाकडून श्री दीपक साळुंखे तालुका कृषी अधिकारी हे उपस्थित होते व त्यांनी माती परीक्षण व त्यामुळे होणारे फायदे शेतकऱ्यांना समजून सांगितले त्याचबरोबर आरसीएफ कडून श्री आशिष रंजन यांनी आरसीएफ कडून मोफत माती परीक्षण व त्यासोबत त्याचे होणारे फायदे व मायक्रो न्यूट्रिएंट्स कसे वापर करावे याबाबत असे सखोल असे ज्ञान शेतकऱ्यांना दिले यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नात निश्चित वाढ होईल अशा विश्वास शेतकऱ्यांनी कार्यक्रम संपल्यानंतर बोलून दाखवला तसेच ज्या वेळेस माती परीक्षणाचे रिपोर्ट येतील ते वाटप करण्याच्या वेळेस त्याबाबत असणारे प्रश्न व समस्या यांच्या निराकरणासाठी एक सहविचार सभा आयोजित करण्याबाबत रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्षांनी आपल्या भाषणातून सांगितले अडावद येथील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य डॉअनिल माळी यांनी केले व आभार भालचंद्र शिवाजी पवार यांनी केले या प्रकल्पासाठी रोटे संजीव गुजराती रोटे निखिल सोनवणे रोटे अनिल अग्रवाल प्रकल्प प्रमुख रोटे आशिष जयस्वाल सहप्रकल्प प्रमुख रोटे डॉ ईश्वर सौंदाणकर अध्यक्ष रोटे बी एस पवार मानद सचिव, रोटे संजय बारी सहसचिव व रोटरी सदस्य उपस्थित होते

No comments