adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रॉंगसाईड वाहने चालवणाऱ्या वाहनचालकांना पोलिसांचा दणका,राज्यपरिवहन महामंडळाच्या बसचालकावरही कायदेशीर कारवाई

  रॉंगसाईड वाहने चालवणाऱ्या वाहनचालकांना पोलिसांचा दणका,राज्यपरिवहन महामंडळाच्या बसचालकावरही कायदेशीर कारवाई सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -...

 रॉंगसाईड वाहने चालवणाऱ्या वाहनचालकांना पोलिसांचा दणका,राज्यपरिवहन महामंडळाच्या बसचालकावरही कायदेशीर कारवाई


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि२४):-राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत वारंवार ट्राफिक जाम होत असून सदर जामचे मूळ कारण हे बरेचसे वाहनचालक हे थोडेही ट्राफिक जाम असल्यास फुटलेल्या रोड डिव्हायडर मधून रॉंग साईडने गाड्या टाकतात व त्यामुळे तासंतास वाहतुकीचा खोळंबा होतो.त्यावर उपाययोजना म्हणून चौकात वाहतूक नियमन करण्याबरोबरच रॉंग साईड वाहने टाकून ट्राफिक जाम करणाऱ्या सहा वाहनचालकांवर  MVA 122/177 प्रमाणे राहुरी पोलिसांनी कारवाई केली. यापूर्वीही दि.10 मे 2025 रोजी दोन वाहन चालकांवर धोकादायक वाहन चालवल्या बाबत कारवाई करून न्यायालयामार्फत दोन्ही वाहनांवर सुमारे पाच हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आलेली होती.बऱ्याच वेळी एसटी महामंडळाच्या बसेस चे चालक सुद्धा रॉंग साईड गाड्या टाकतात असे निदर्शनात आल्याने दि.11 मे 2025 रोजी राज्य परिवहन महामंडळ बस स्थानक प्रमुख राहुरी व राज्य परिवहन महामंडळ आगार प्रमुख श्रीरामपूर यांना लेखी पत्र व्यवहार करून सर्व बस चालकांना कोणत्याही परिस्थितीत रॉंग साईड गाडी टाकून वाहतुकीला अडथळा न करण्याबाबत कळवलेले होते.


तरीसुद्धा आज सुमारे 11.30 चे सुमारास अकलुज डेपोची बस क्र:-MH-14-BT-4224  वरील चालकाने राहुरी कॉलेज ते राहुरी बसस्थानक दरम्यान ट्राफिक जाम झाल्याने रॉंग साईट धोकादायक पद्धतीने गाडी घातली ज्यामुळे अधिकच ट्राफिक जाम झाल्याने सदर बस वर MVA 184 प्रमाणे कारवाई केली.याबाबत राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी नागरिकांना आव्हान केले की कोणीही रॉंग साईड गाडी टाकून वाहतूक जाम करू नये.तसेच वाहतूक जाम टाळण्यासाठी अशा प्रकारची कारवाई नियमित राहुरी फॅक्टरी तथा राहुरी शहरात केली जाणार असल्याची माहिती राहुरी पोलिसांनी दिली.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलुवर्मे,उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे,पीएसआय आहेर,पोलीस हवालदार संतोष ठोंबरे,पोलीस हवालदार फुलमाळी,सचिन ताजणे यांच्या पथकाने केली.

No comments