रत्नागिरीत अंमली पदार्थ विकणारी साखळी तोडून टाकणार नूतन पोलीस अधीक्षक :- नितीन बागटेंचा कडक इशारा..!! अंजली पुरी गोसावी (रत्नागिरी जिल्...
रत्नागिरीत अंमली पदार्थ विकणारी साखळी तोडून टाकणार नूतन पोलीस अधीक्षक :- नितीन बागटेंचा कडक इशारा..!!
अंजली पुरी गोसावी (रत्नागिरी जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची मुंबईला बदली झाल्या असून त्यांच्या रिक्त जागेवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून नव्याने आलेले नितीन बागटे यांनी अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्याकडून शनिवारी पदभार स्वीकारला आहे, मी अतिशय संवेदनशील जिल्ह्यातून शांतता असलेल्या जिल्ह्यात आलो आहे, रत्नागिरी जिल्ह्यात असलेली शांतता भंग होऊ देणार नाही अशा शब्दांत रत्नागिरी जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक नितीन बागटे यांनी आपली भूमिका पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे, रत्नागिरीत अंमली पदार्थ विकणारी साखळी टोळी तोडून टाकणार अशा कडक शब्दांत ड्रगजमाफियांना इशारा दिला आहे, नितीन बगाटे हे छत्रपती संभाजीनगर येथून रत्नागिरीत दाखल झाले आणि त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला आहे, मी 2021 ते 2023 या काळात सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक पदावर काम केले आहे, मी रत्नागिरीत दोनवेळा आलो आहे, त्यामुळे मला कोकणची चांगलीच माहित आहे, रत्नागिरीची शांतता भंग होऊ देणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला पोलिसांच्या फिटनेस संदर्भात बोलत असताना ते म्हणाले की पोलिसांनी फिट असले पाहिजे, येणाऱ्या तक्रारदारांशी व्यवस्थित संवाद साधला पाहिजे, कामात पारदर्शकता पाहिजे, एखाद्या घटनेनंतर तात्काळ प्रतिसाद देता आला पाहिजे, या करिता मी नेहमीच प्रयत्नशील, राहणार आहे, असेही नूतन पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सांगितले आहे

No comments