सहकार भारती आयोजित राष्ट्रीय डेअरी अधिवेशन चे उद्घाटन भविष्यात भारत जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- ...
सहकार भारती आयोजित राष्ट्रीय डेअरी अधिवेशन चे उद्घाटन भविष्यात भारत जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भविष्यात जगातील सर्वात अधिक दूध उत्पादन करणारा देश ठरणार आहे असे प्रतिपादन गुजरात राज्याचे मा विधानसभा अध्यक्ष शंकरराव चौधरी यांनी केले सहकार भारती आयोजित राष्ट्रीय डेअरी अधिवेशन चे उद्घाटन गुजरातचे सहकार मंत्री ना जगदीश विश्वकर्मा व एन डी डी बी अध्यक्ष मनीष शहा अमूल डेअरी चे चेअरमन विपुल भाई पटेल राष्ट्रीय महामंत्री दीपक चौरसिया राष्ट्रीय संघटन प्रमुख दिलीप रामू पाटील यांचे हस्ते झाले गोवंश विस्तार करण्यासाठी नवीन वाण संशोधन केले असून ३० ली दूध देणाऱ्या देशी गायी आता उपलब्ध होणार असून या मुळे जगात दुसरी दूध क्रांती होणार असून याबाबत सविस्तरपणे माहिती उपस्थित देशभरातील प्रतिनिधी ना दिली देशाचे ५ ट्रेलियन अर्थव्यवस्थेत सहकारी डेअरी चा मोठा सहभाग नोंदवला जाईल अशी ग्वाही सहकार मंत्री जगदीश विश्वकर्मा यांनी दिली अधिवेशनात जिल्हा अध्यक्ष नरेंद्र नारखेडे टी एम सोसायटी चे अध्यक्ष शरद महाजन धनंजय फिरके उपाध्यक्ष सुधीर आबा पाटील महामंत्री शशिकांत बेहडे विकास देवकर यासह जळगांव जिल्ह्यातील सुमारे ५० प्रतिनिधी सहभागी झाले आहे या अधिवेशनात आलेले गुजरात राज्यविधान सभा अध्यक्ष ना शंकर राव चौधरी यांची जिल्हा अध्यक्ष नरेंद्र नारखेडे व शरद महाजन व सहकारी यांनी भेट घेतली जळगाव जिल्ह्यातील दूध डेअरी संस्था व दुध संघ वाटचाल सद्यस्थिती व सहकार क्षेत्रात नवीन सुधारणा करणे बाबत चर्चा झाली दूध संघ संस्थापक स्व दादासाहेब जे टी महाजन यांचे दूध व्यवसाय बद्दल असलेला दृष्टीकोन बाबत माहिती त्यांनी समजून घेतली राष्ट्रीय डेअरी अधिवेशन गुजरात राज्यात आनंद येथे एन डी डी बी चे आडोटी रियम मध्ये सुरू आहे.

No comments