खुनाचा प्रयत्न करून फरार असलेले दोघे गावठी कट्टयासह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड)...
खुनाचा प्रयत्न करून फरार असलेले दोघे गावठी कट्टयासह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि२१):- खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयात 2 फरार आरोपीस गावठी कट्टयासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मोठे यश आले आहे.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दि.21 मे 2025 रोजी पाथर्डी शहरामध्ये अवैध अग्निशस्त्र बाळगणारे इसमांची माहिती घेत असताना पथकास इसम नामे मुदस्सर सादीक सय्यद व सोमनाथ रमेश काळोखे रा.पाथर्डी असे अग्निशस्त्र बाळगुन ते विक्रीसाठी माणिकदौंडी चौक ता.पाथर्डी येथे थांबले असलेबाबत गोपनीय माहिती मिळाली.मिळालेल्या माहितीवरून पथकाने पंचासमक्ष माणिकदौंडी चौक,पाथर्डी येथे जाऊन संशयीत इसमांचा शोध घेऊन मुदस्सर सादीक सय्यद, वय 22,रा.सिव्हील हॉस्पीटलजवळ,ता.पाथर्डी, सोमनाथ रमेश काळोखे वय 24, रा.आनंदनगर,ता.पाथर्डी जि.अहिल्यानगर यांना ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपी कडून 1 लाख 40,400/- रू.किं.त्यात एक गावठी कट्टा,दोन जिवंत काडतुस व 4 मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पथकाने ताब्यातील आरोपीचे अभिलेखाची पडताळणी केली असता नमूद आरोपी हे पाथर्डी पोलीस स्टेशन गुरनं 343/2025 बीएनएस कलम 109, 118 (2), 352, 351 (2), 189 (2), 191 (2) वगैरे गुन्हयात पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे.आरोपीस जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह पाथर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले.ताब्यातील आरोपी हे बेकायदेशीरपणे गावठी कट्टा व जिवंत काडतुस विक्री करण्याचे उद्देशाने बाळगताना मिळून आल्याने त्यांचे विरूध्द पाथर्डी पोलीस स्टेशन गुरनं 562/2025 आर्म ऍ़क्ट 3/25,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयांचा पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन हे करीत आहेत. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.सुनिल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव उपविभाग,स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार गणेश लोढे,शिवाजी ढाकणे,अशोक लिपणे,रोहित मिसाळ,विशाल तनपुरे,मेघराज कोल्हे,प्रशांत राठोड व भाग्यश्री भिटे यांनी केलेली आहे.

No comments