चक्रीवादळाने नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत द्या. स्वराज्य पक्षाची मागणी. अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेम...
चक्रीवादळाने नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत द्या. स्वराज्य पक्षाची मागणी.
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
संग्रामपूर /तालुक्यात चक्रीवादळाने नुकसान झालेल्या केळी पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत द्या. अशी मागणी स्वराज्य पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी दि.७ मे २०२५ रोजी तहसीलदार यांचेकडे लेखी निवेदनातून केली आहे. तालुक्यात अचानक प्रचंड मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ होऊन शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी बँकेकडुन कर्ज घेऊन व काही शेतकऱ्यांनी उसनवार करून केळी पिकाला खर्च करून शेतात बागा फुलवल्या होत्या. परंतु हे केळीचे पिके कापणीला आले असतांना दि. ६ मे २०२५ रोजी संध्याकाळी सहा वाजताच्या दरम्यान अचानक मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ आले व सर्व केळीच्या बागा जमीन दोस्त झाल्या आहेत. शेतकऱ्यांचे हे झालेले नुकसान भरून निघनार नाही त्यामुळे शेतकरी पुर्णपणे खचुन गेले आहेत.
या झालेल्या नुकसानीचे तत्काळ वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा शेतकऱ्यांन समोर आत्महत्या शिवाय कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. प्रशासनाने दिरंगाई न करता नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. जेणेकरून शेतकऱ्यामंधे जगण्याची उम्मीद निर्माण होईल. नुकसानीचे तत्काळ पंचनामे न झाल्यास सर्व नुकसानग्रस्त शेतकरी शेतातील नुकसान झालेले पिके तहसीलच्या दालनात आणुन टाकु असा इशारा स्वराज्य पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी निवेदनातुन दिला आहे. या निवेदनावर स्वराज्य पक्षाचे नेते गौरव जळमकार,विजय काळपांडे, विशाल चोपडे,विशाल मुरुख, निलेश हागे, वसंत राहणे,कलिमोद्दीन काझी, किसन घायल, रोहित घायल, सुभाष पाटील, गौतम लहासे, तुळशीदास म्हसाळ, नरेंद्र काळमेंघ, भगवान हागे, गणेश सोनटक्के, प्रकाश हागे, पवन कोकाटे यांचेसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.


No comments