adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आमदार चंद्रकांत सोनवणे यांची अवकाळी वादळ व पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची पहाणी

  आमदार चंद्रकांत सोनवणे यांची अवकाळी वादळ व पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची पहाणी  तात्काळ पंचनामे करण्याचे दिले आदेश    चोपडा प्र...

 आमदार चंद्रकांत सोनवणे यांची अवकाळी वादळ व पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची पहाणी 

तात्काळ पंचनामे करण्याचे दिले आदेश   


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

धानोरा येथे व परिसरात अवकाळी वादळ व पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानाची देवगाव,धानोरा,लोणी, पंचक,येथे पाहणी केली व अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.यावेळी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या समवेत उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोडे,प्रांताधिकारी नितीन मुंडावरे,तहसीलदार भाऊसाहेब थोरात,गटविकास अधिकारी अनिल विसावे,कृषी अधिकारी आर एन पाटील,कृषी सहायक मंडळ अधिकारी व तलाठी तसेच सर्व प्रशासकीय यंत्रणा सोबत होती. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतांची तातडीने पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्याकडुन देण्यात आल्या.यावेळी धानोरा गावातील व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 




No comments