चुंचाळ्यात गुरु शिष्य पुण्यतिथी उत्साहात साजरी हजारो भाविकांनी घेतले समाधीस्थळाचे दर्शन भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत...
चुंचाळ्यात गुरु शिष्य पुण्यतिथी उत्साहात साजरी
हजारो भाविकांनी घेतले समाधीस्थळाचे दर्शन
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
तालुक्यातील चुंचाळे येथे श्री समर्थ सुकनाथ बाबा यांची तपोभुमी,श्री रघुनाथ बाबा यांची जन्मभुमी व वासुदेव बाबा याची कर्मभुमी अशा या सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या पावन भुमीत गुरु शिष्य पुण्यतिथी चा अनोखा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला चुंचाळे येथील ग्रामस्थांनी दिनांक ९ मे रोजी गुरु शिष्य पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते कार्यक्रमाला तालुका जिल्हा सह गुजरात मध्य प्रदेश मधून भाविक आले होते
भाविकाची मनोकामना पुर्ण झाल्याने नवस फेडले व या वर्षी शेतकरी राजा सदासुखी रहावा यासाठी होमहवन करण्यात आले दिवस भर भजन भारुडे सुरु होते
असा झाला कार्यक्रम..
पहाटे पाचला मुर्ती अभिषेक सहा वाजता मारुती अभिषेक दुपारी साडेबाराला महाआरती सायकांळी सातला आरती सकाळी आरतीची वेळ सोडून दिवसभर भजन भारुडे व दुपारी एक वाजे पासून रात्रीपर्यन्त महाप्रसादाचे वाटप करण्यात आले

No comments