फैजपूर येथे एम्पिजेच्या (MPJ) पाठपुराव्याला यश: नुरूल इस्लाम मस्जिदसमोर अखेर साफसफाईचे कामाला सुरूवात इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमक...
फैजपूर येथे एम्पिजेच्या (MPJ) पाठपुराव्याला यश: नुरूल इस्लाम मस्जिदसमोर अखेर साफसफाईचे कामाला सुरूवात
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
नुरूल इस्लाम मस्जिद समोर साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात निर्माण झालेली अस्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने निर्माण झालेला धोका लक्षात घेता, एमपीजे फैजपूर युनिट (मूव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस) या सामाजिक संस्थेने दिनांक २ मे २०२५ रोजी नगर परिषदेकडे एक निवेदन सादर केले होते. या निवेदनाद्वारे मस्जिद परिसरात त्वरित साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. नागरिकांच्या या योग्य मागणीची दखल घेत, दिनांक ७ मे २०२५ रोजी फैजपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी साफसफाईसाठी अधिकृत आदेश जारी केले.
यापूर्वी नागरिकांकडून अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या होत्या, मात्र कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नव्हती. मात्र एमपीजेने पाठपुरावा करून नगर परिषदचे लक्ष केंद्रित केल्याने अखेर आज शुक्रवार, ९ मे रोजी नगर परिषदेकडून JCB मशीनच्या सहाय्याने संबंधित ठिकाणी साफसफाईच्या कामाची प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ही कार्यवाही आवश्यक असल्याचे मत स्थानिकांनी मांडले आहे. एमपीजेच्या प्रयत्नांना धन्यवाद देत अनेकांनी त्यांच्या सामाजिक भानाबद्दल कौतुक व्यक्त केले आहे. सफाई करतांना मार्गदर्शन करणारे रहिमुद्दिन जहुरुद्दिन, मुस्तकीम खान, इक्बाल शेख,सद्दाम कुरेशी,रशीद तडवी इतर उपस्थित होते. चांगलं प्रकारे काम करण्या साठी JCB चालक रमेश बरेला यांचा ही कौतुक उपत्थितांनी केल.


No comments